मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सातबारा उतार्यावर नाव नोंद करण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शिराळा तहसील कार्यालयातील तलाठी आनंद दामू घेरडे (वय 46, रा.मेणी रांजणी, ता. शिराळा) याला अटक केली आहे. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. घेरडे याच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले : तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची सातबारा उतार्यावर नावाची नोंद करून देण्याकरीता घेरडे याने त्यांच्याकडे सात हजार रुपयांची मागणी केली होती. तशी तक्रार तक्रारदार त्यांनी एक जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
विभागाने घेरडे याच्याविरूध्द शिराळा येथील प्रशासकीय इमारतीत सापळा लावला. मात्र घेरडे याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही. मात्र लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, पोलिस कर्मचारी जितेंद्र काळे, संजय कलकुटगी, संजय संकपाळ, अविनाश सागर, राधिका माने, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.
पोलिस निरीक्षक मोरे म्हणाले, लाच मागणीसंबंधाने तक्रारी असल्यास पोलिस उपअधीक्षक ( लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बदाम चौक, सांगली) येथे संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज