मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सुधारित नागरिकत्व कायदा संसदेने मंजूर केल्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित मायदेशी परत जाण्याचे प्रमाण वाढले आहे,असे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे.
सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक वाय.बी खुराणिया यांनी सांगितले, की गेल्या महिन्यात अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्यात आले होते.उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातून मायदेशी जाणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांची संख्या अधिक आहे. हा जिल्हा बांगला देश सीमेला लागून आहे. गेल्या महिनाभरात स्थलांतरित बांगलादेशात परत जाण्याचे प्रमाण वाढले असून जानेवारी महिन्यात २६८ बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरित परत गेले आहेत.
पश्चिम बंगाल व बांगलादेश यांच्यात २२१६.७ कि.मीची संयुक्त सीमा असून बऱ्याच भागात कुंपण नाही. सध्या बांगलादेशी स्थलांतरित परत जात असून त्यांच्याकडे काही तस्करीच्या वस्तू असतील तरच अडवले जाते अन्यथा त्यांना त्यांची माहिती घेऊन मायदेशी जाऊ दिले जाते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज