मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
गोकुळनगर तांडा , कडबगाव ( ता . अक्कलकोट ) येथील बंजारा समाजाचे रमणादेवी मंदिरात तेथीलच एका युवकाने देवीच्या अंगावरील १ लाख रुपये किमतीचे दागिणे चोरुन नेल्याप्रकरणी आम्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरील घटना २८ जानेवारी २०२० रोजी दुपारी २ . ३० या सुमारास गोकुळनगर तांडा येथे घडली आहे . या घटनेची अधिक माहिती अशी की , गोकुळनगर तांडा , काइबगाव ( ता . अक्कलकोट ) येथील बंजारा समाजाचे आराध्य दैवत रमणादेवी मंदिगातील देवीच्या अंगावरील ३० हजार किमतीचे सोन्याचे नेकलेस , १५ हजार किमतीचे दस्सी , ३० हजार किंमतीचे मण्यांचे दोन माळ , १० हजार किंमतीचे एक बोरमाळ , १५ हजार किंमतीचे एक नाकातील नथ , ३०० रूपयाचे एक चांदीची माळ असे एकूण २ लाख ३०० रुपयाचे सोने व चांदीचे मुमाल मंदिराचे दार उचकटून आरोपी चंद्रकांत जगन्नाथ राठोड यांनी चोरुन नेले आहे . . अशी फिर्याद मंदिगाचे पुजारी लक्ष्मण धनसिंग चव्हाण ( वय ४५ , रा . गोकुळनगर तांडा , कडबगाव ) यांना दक्षिण पोलिस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . या पटनेचा अधिक तपास पोहेका राठोड हे करीत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज