मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
माघवारी कालावधीत सर्व विभागांनी समन्वय ठेवून सोपविलेल्या कामांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी . स्वच्छतेला प्राधान्य देवून , यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या .
माघवारी नियोजनाबाबत प्रांत कार्यालय , सांस्कृतिक भवन येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते . बैठकीस तहसिलदार वैशाली वाघमारे , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विशाल बडे , मुख्याधिकारी अनिकेत महानोरकर , उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ . जयश्री ढवळे , पो . नि . किरण अवचर , पो . नि . दयानंद गावडे , मंदीर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर , सा . बां विभागाचे हनुमंत बागल , न . पाचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर आदी उपस्थित होते .
यात्रा कालावधीत नगरपालिकेने शुध्द व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी , नदीपात्रातील वाळवंटाची व घाटाची स्वच्छता करावी , मंदीर परिसरात अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करावी . तसेच आदी सुविधा त्यांना देण्यात । याव्या असेही सांगण्यात आले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज