मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मेटकरवाडी ता. मंगळवेढा येथील कॉलेज युवक सागर सुभाष वाघमोडे (वय 19) याचा मेटकरवाडी येथीलच बंडू मेटकरी याने गाडीवरून घरी सोडण्याच्या किरकोळ कारणावरून लाथा बुक्क्याने मारहाण करून खून केल्या घटना शनिवारी रात्री 7.15 वाजता खडकी ता. मंगळवेढा येथे घडली.
दरम्यान आरोपी बंडू मिटकरी याला पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली आहे. रविवारी आरोपी मिटकरी यांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील मयत सागर वाघमोडे हा मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी महाविद्यालयातील विद्यार्थी असून कॉलेज सुटल्यानतंर तो आपल्या गावी गेला होता. दि.1 फेब्रुवारी रोजी रात्री 7.15 वाजता काही कामानिमित्त तो खडकी येथे गेला होता. यावेळी बंडू मेटकरी व मयत सागर वाघमोडे यांच्यात गाडीवरून घरी सोडण्याच्या कारणावरून शाब्दीक बाचाबाची झाल्याने चिडलेल्या आरोपी बंडूने लाथा बुक्क्याने जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. घरातील नातेवाईकांनी अधिक उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रूग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच तो मयत झाला.
दरम्यान वाघमोडे कुटुंबियामध्ये मयत सागर हा एकाटाच महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याचे आई वडील ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात गेले आहेत. मयत हा त्याच्या आजी जवळ राहत होता. तरूणाची हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील यांनी खडकी येथे येऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे. पुढील तपास स.पो.नि. भगवान बुरसे हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज