mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सातवीच्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकाने केला विनयभंग

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सातवीच्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून शिक्षकाने केला विनयभंग

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-


शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ व फोटो दाखवून त्यांचा विनयभंग केला. सिडको पोलिस ठाण्याजवळ असलेल्या एका नामवंत शाळेत हा प्रकार घडला. 

शाळा प्रशासनाने शिक्षकाला पाठीशी घातल्यानंतर विद्यार्थिनींनी थेट शिक्षणमंत्री, महिला आयोग व पोलिस आयुक्तांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली. त्यानंतर दोन दिवसांपासून शाळेत विशेष पथकाकडून चौकशी सुरू असून मुलींना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी आपबीती सांगितली.

दरम्यान, या प्रकरणात पालकांना तक्रार करण्याचे आवाहन पोलिस पथकाकडून करण्यात आले. परंतु, आधी आक्रमक असलेल्या पालकांनी नंतर नकार दिला

मात्र, पालकांनी तक्रार दिली तर ठीक, नाहीतर चौकशी अधिकारी यात फिर्याद देऊन संबंधित दोषी शिक्षकाविरुद्ध पोक्सो व विनयभंग प्रकरणी गुन्हा नोंदविला जाणार आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आणि वेगवेगळ्या सत्रांमध्ये भरणाऱ्या या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या काही मुलींवर येथील एका शिक्षकाची वाईट नजर पडली. त्याने मुलींना अश्लील व्हिडिओ, फोटो दाखविले. तसेच, त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार अल्पवयीन मुलींना किळसवाना वाटला. त्यामुळे मुली प्रचंड घाबरल्या. त्यांनी हा प्रकार शाळेतील शिक्षिकांच्या कानावर घातला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शिक्षिकांनी तत्काळ मुख्याध्यापकांशी चर्चा करून कारवाईची मागणी केली. परंतु, त्यांच्याकडून काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शिक्षिका आणि मुलींनी संस्थाचालकांशी चर्चा केली. कारवाईची मागणी केली असता त्यांनी शिक्षकांनाच अरेरावी करून गप्प बसविले. त्यांनी शिक्षिकांचाही आवाज दाबून प्रकरण संपविण्याचा प्रयत्न केला.

शिक्षकाची बदली

सकाळच्या सत्रात सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या या शिक्षकाची शाळेने दुपारच्या सत्रात भरणाऱ्या पहिली ते पाचवीच्या वर्गावर बदली केली. परंतु, त्यामुळे हा शिक्षक सुधारेल याची काहीही शाश्वती नाही. महत्त्वाचे म्हणजे, सातवीच्या मुली किमान पुढे आल्या. पहिली ते पाचवीच्या मुलींशी हा प्रकार घडला तर त्या बोलू शकत नाहीत. त्यामुळे या शिक्षकाविरुद्ध कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, असा सूर पालकांमधून उमटत आहे.

दोन दिवसांपासून चौकशी सुरू

पोलिस आयुक्तालयात पत्र मिळाल्यानंतर विशेष पथकामार्फत चौकशी सुरू करण्यात आली. पथकाने सलग दोन दिवस शाळेत भेट दिली. नियमित भेट असल्याचे सांगून त्यांनी मुली आणि शिक्षिकांशी बंद खोलीत चर्चा केली. तेव्हा मुलींनी रडत आपबीती सांगितली. यावेळी काही मुली गैरहजर असल्याचे समोर आल्यावर पथकाने घरी जाऊन मुली आणि त्यांच्या पालकांना विश्वासात घेत विचारपूस केली. तोपर्यंत पालकही अनभिज्ञ होते.

म्हणे, मुलींनीच ‘तशी’ माहिती विचारली

मुलींशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाची तक्रार केल्यानंतर शाळा प्रशासनाने सारवासारव केली. विशेष म्हणजे, हा प्रकार कसा खोटा हे दाखविण्यासाठी त्यांनी मुलींना धमकावले. तसेच, आम्हाला लैगिकतेविषयी माहिती द्या, असे आम्हीच शिक्षकाला विचारले होते, असे त्यांच्याकडून लिहून घेतले. मुलींकडून असे लिहून घेतल्याचे समजल्यानंतर पालक काहीसे बॅकफुटवर गेले. शिक्षकावर कारवाई न झाल्यास मुलींना त्रास होईल, या भीतीपोटी त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeMaharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापुरात विमानतळ परिसरामध्ये भीषण आग

सोलापुरात विमानतळ परिसरामध्ये भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजमाता अर्बन बँक रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; दामाजी चौकात बँकेची 24 तास ATM सेवा सुरू

मंगळवेढ्यात ‘राजमाता बँकेचा’ उद्या वर्धापनदिन; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चहापानाचे आयोजन

March 18, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

​पोलिसांचा आशीर्वाद की यंत्रणेचा सुस्तपणा? गुन्हा दाखल असलेले ‘ते’ १० विद्यार्थी अजूनही मोकाटच; मनसेचा पोलीस महानिरीक्षकांना सवाल

March 18, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढा हादरलं! चाकूचा धाक दाखवून भरवस्तीत घरफोडी; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

March 18, 2026
दक्षिण भागात म्हैसाळचे पाणी “टेल टू हेड” मिळणेसाठी आ.आवताडे यांची विधानसभेत मागणी; देवेंद्र फडणवीस यांचे सकारात्मक उत्तर

नदी वाचवा, निधी द्या! भीमेच्या शुद्धीकरणासाठी १०० कोटी द्या; आमदार आवताडेंची सरकारकडे आग्रही मागणी; विधानसभेत घुमवला आवाज

March 17, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

मोठी बातमी! ​गरीबांच्या हक्काच्या पैशावर डल्ला; लाचखोर ग्रामपंचायत कर्मचारी अटकेत

March 17, 2026
कामाची बातमी! मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया उपचार सुरू

मंगळवेढ्यातील गजानन लोकसेवा हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य शिबीर: मोफत तपासणी आणि उपचारांची सुवर्णसंधी

March 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा