टीम मंगळवेढा टाईम्स ।
तुम्ही आमच्याकडे पूर्वी कपडे खरेदी केले होते, आता तुम्ही तुमच्या खरेदीवर पन्नास रुपये सवलत मिळणार आहे, असे सांगून
दोन रुपये फोन पे वरून पाठवा, त्यानंतर विशिष्ट अॅप डाऊनलोड करा असे सांगून बोलण्यात गुंतवून सुमारे ८३ हजार ८८२ रुपयाची फसवणूक सांगोल्यात झाली आहे.
मुकुंद राजाराम भोसेकर (रा. स्टेशन रोड, सांगोला) यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे. २६ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीचा भोसेकर यांच्या मोबाइलवर कॉल आला.
स्नॅपडीलवरून आपण पूर्वी कपडे खरेदी केले आहेत. आताच्या खरेदीवर आपल्याला पन्नास रुपये सवलत आहे तुम्ही दोन रुपये फोन पे वरून पाठवा प्ले स्टोअर वर जाऊन एक अॅप डाऊनलोड करा, असे सांगून अॅप डाऊनलोड करायला लावले.
भोसेकर यांनीही त्यांनी सांगितल्याप्रमाणे अॅप डाऊनलोड केले. दरम्यान त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत भोसेकर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या खात्यामधून
प्रथम २१ हजार ४७१, त्यानंतर ६१ हजार ४११ असे ८२ हजार 882 रुपये खात्यातून काढून घेतले. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात सायबर सेल कडे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज