मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
बारावीच्या परीक्षेचा पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने राज्यात 82 विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. कॉपीमध्ये लातूर पॅटर्न दिसून आला असून या विभागात सर्वाधिक 34 जणांवर कारवाई केली. तर मुंबई व कोकण या दोन विभागात एकही विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळलेला नाही. अशी माहिती राज्य माध्यमीक व उच्च माध्यमीक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
शिक्षण मंडळाकडून 12वी व 10वीची परीक्षा शांततेत व गैरप्रकार विरहीत व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. स्थानिक दक्षता समिती, केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थी उद्बोधन, प्रजासत्ताकदिनी प्रार्थना, पालकसभा घेऊन विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी जनजागृती केली होती.
इंग्रजी विषयाची भिती असल्याने या पेपरला सर्वाधिक कॉपी करण्यासाठी विद्यार्थी तयारीत असतात. विशेषताः ग्रामीण भागामध्ये कॉपीचे प्रकरणे जास्त घडतात. त्यामुळे परीक्षा केंद्र प्रमुख, परीक्षक यांना व्यवस्थित लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
इंग्रजीच्या पेपरला सर्वाधिक कॉपीची प्रकरणे लातूर विभागात झाली असून, तेथे 34 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे विभागात 6, नागपूर 4, औरंगाबाद 7, कोल्हापूर 4, अमरावती 9, नाशिक विभागात 18 विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. तर मुंबई व कोकण विभागात एकाही विद्यार्थ्यावर कॉपीची कारवाई करण्यात आलेली नाही, अशी माहिती शिक्षण मंडळाने दिली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज