mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शब्बास रे पठ्ठ्या! सलग 81 तास स्केटिंग; मंगळवेढयात पंक्चर काढणाऱ्याच्या मुलाने केला विश्वविक्रम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 4, 2021
in मंगळवेढा, राष्ट्रीय
शब्बास रे पठ्ठ्या! सलग 81 तास स्केटिंग; मंगळवेढयात पंक्चर काढणाऱ्याच्या मुलाने केला विश्वविक्रम

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आपल्या मुलांनी शिकावं, आवडत्या खेळात प्राविण्य मिळवावे, आपलं नाव मोठे करावे या सदहेतूने कबाडकष्ट करत आपल्या मुलांला लागेल ते पुरवणाऱ्या पंक्चर काढणाऱ्याच्या

सहा वर्षाच्या अथर्व देविदास आकळे या मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील स्केटिंगपट्टूनें बेळगाव येथे झालेल्या स्केटिंग स्पर्धेत सलग ८१ तास स्केटिंगचा नवा विश्वविक्रम नोंदवला आहे.

देविदास आकळे यांनी लॉकडाऊनमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी तीन वर्षांपूर्वी पुणे येथे गेले मात्र नोकरी मिळाली नसल्याने खचून न जाता टायर पंक्चर चे दुकान सुरू केले.

पत्नीनेही शिलाई मशिनचे काम करून कुटुंबाला हातभार लावण्याचे काम सुरू ठेवले. मुलगा सहा वर्षाचा असून त्याला स्केटिंग ची आवड होती मात्र त्यासाठी प्रशिक्षण व त्यासाठी लागणारे साहित्य घेण्याचीही परिस्थिती नव्हती.

मात्र त्या दोघानी रात्रंदिवस कष्ट करून पैसे जमवून त्याला सर्व साहित्य घेतले, त्याची प्रशिक्षनासाठीची फी भरून त्याला सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले.

पुणे येथील प्रशिक्षक विजय मलजी यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. अथर्वची मेहनत व जिद्द पाहून त्याची बेळगाव येथील स्केटिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

ही स्पर्धा शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब व रोट्रॅक्ट क्लब बेळगाव यांनी २७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत घेतली. यामध्ये महाराष्ट्र दिल्ली हरियाणा, मुंबई, कोल्हापूर, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, चेन्नई , यासह देशातून २१० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

यामध्ये अथर्व आकळे याने २०० मीटर स्केटिंग ट्रॅक वर रिले पद्धतीने स्केटिंग करत १० हजार ११६ फेऱ्या पूर्ण करत सलग ८१ तास स्केटिंगचा नवा विश्वविक्रम केला आहे.

या लहान खेळाडूची वेगवेगळ्या ९ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. देविदास आकळे यांनी अंत्यत गरीब परिस्थितीत मुलाला स्केटिंगचे प्रशिक्षण दिले.

आई वडिलांच्या कष्टाचे फलित मुलगा राष्ट्रीय खेळाडू होण्याच्या रूपाने फेडत असेल तर नक्कीच ते आईवडील कृत्यकृत्य होत असतील. त्याची संघर्षाची कहाणी बघणाऱ्यांना मुलगा अथर्व चे हे यश बघून अक्षरश: डोळ्यात पाणीच तरळते आहे.

आमच्या गावासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. अशी भावना डोंगरगाव येथील दादासाहेब खिलारे व विवेक खिलारे यांनी व्यक्त केली.

अथर्व च्या कामगिरीची माहिती गावात कळताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला आहे.सर्व स्तरातून त्याच्या विक्रमी कामगिरीचे कौतुक होत आहे. भाजपा सरचिटणीस बिज्जू प्रधाने, पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीमंत आकळे , बँक ऑफ इंडियाचे दादासाहेब खिलारे यांनी यशाचे कौतुक केले.

आमची छाती अभिमानानं फुलली

अगदी लहान वयापासूनच स्केटिंग पट्टू होण्याची इच्छा मनात होती. त्यानं बालपणापासून स्केटिंग पट्टू होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. यानंतर अवघ्या सहाव्या वर्षी त्यानं आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. इतक्या लहान वयात अथर्व ने विश्वविक्रम केल्याने आमची दोघांची छाती अभिमानानं फुलली आहे. देविदास आकळे , वडील डोंगरगाव, ता मंगळवेढा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढाविश्वविक्रम

संबंधित बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

मंगळवेढ्यातील ज्वारीपासून बनणार बिस्कीट, केक, पास्ता, रवा, ढोकळा; ज्वारी प्रक्रिया उद्योग या विषयावर शेतकरी प्रशिक्षण

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा