मंगळवेढा : समाधान फुगारे
पंढरपूर विधानसभा मतदासंघात निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी २८ अर्जापैकी ८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
मतदारसंघासाठी छाननीत एकूण 28 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते . उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी दुपारी 3 . 00 वाजेपर्यंत अवधी देण्यात आला होता.
उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यामध्ये सतिश अशोक पाटील ( संघर्ष सेना ) , रामचंद्र नाना परचंडे ( अपक्ष ) , अकुंश महादेव शेंबडे ( अपक्ष ) , गोडसे शैला धनंजय ( अपक्ष ) , सोनकांबळे लक्ष्मण शंकर ( अपक्ष ) , जुबेर लतिफ बागवान ( अपक्ष ) , आप्पासाहेब दामोदर भोसले ( अपक्ष ) तसेच अनिल दत्तात्रय बोदाडे ( अपक्ष ) या आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत .
पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 20 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत . त्यामध्ये भारत तुकाराम भालके ( नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी ) , शिवाजीराव बाजीराव काळुगे ( इंडीयन नॅशनॅलिस्ट कॉग्रेस ) , सारिका रविंद्र सर्वगोड ( बहुजन समाज पार्टी ) , सुधाकर रामचंद्र परिचारक ( भारतीय जनता पार्टी ) , सिध्देश्वर भारत आवारे ( बहुजन महा पार्टी ) , अॅड . मारुती कृष्णा अवचारे ( बहुजन विकास आघाडी ) , दत्तात्रय तात्या खडतरे ( वंचित बहुजन आघाडी ) तसेच अपक्ष म्हणून आवताडे समाधान महादेव , सुदर्शन रायचंद खंदारे , हनुमंत विठ्ठल बिराजदार , माने संतोष महादेव , प्रताप पांडूरंग कांबळे , अॅड . लोकरे शिवलाल कृष्णा , प्रा . इंजि . नामदेव शेकाप्पा थोरबोले पाटील , निशिकांत बंडू पाटील , अब्दुलरऊफ जाफर मुलाणी , बिराप्पा मधुकर मोटे , सुनिल सुरेश गोरे , आण्णासो सुखदेव मस्के तसेच बिराप्पा ईश्वर वाघमोडे हे उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ढोले यांनी यावेळी दिली.
मतदान सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी होणार असून , मतमोजणी गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर 2019 रोजी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी यावेळी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज