टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात सोमवारी 79 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये नागरी भागात 27 तर ग्रामीण मध्ये 52 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात काेराेनाने डोके वर काढल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. सद्या पंढरपुर-मंगळवेढा निवडणूक लागल्याने मंत्र्याची सभेसाठी वर्दळ वाढल्याने काेराेनाचे नियम पायदळी तूडवत सभांना भरगच्च गर्दी वाढत आहे.
परिणामी काेराेना रूग्णांची संख्या वाढत आहे. दामाजी ग्रामपंचायत व चोखामेळा ग्रामपंचायत भाग ग्रामपंचायत प्रशासनाने सिल केला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था रुक्मिणी माता मुलींचे वस्तीग्रहात केली आहे.
जिल्ह्यामध्ये सोमवारी 641 पॉझिटिव्ह आले आसुन त्यामध्ये 397 पुरुष व 243 महिला आहेत. जिल्ह्यात एकूण नऊ मयत झाले आहेत.
मंगळवेढयातील बेशिस्तांकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूल; मंगळवेढा नगरपरिषद महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई
मंगळवेढा नगरपरिषद , महसूल विभाग व पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवेढा शहर व परिसरातील दुकानांवर कारवाई करून दुकानदारांकडून एकूण ४० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा सोडून जी दुकाने सुरु होती त्यांचेवर प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे २७ दुकानांवर कारवाई करून २७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला तर पाच पेक्षा जास्त लोक एकत्र दुकानामध्ये असलेल्या दुकानांवर कारवाई या करून १३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
सदरच्या कारवाईमध्ये घाडगे कलेक्शन या दुकानास यापुर्वीही दंड केला असल्याने आदेशानुसार सदरचे दुकान हे सील करण्यात आले.
कारवाईमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील , न.पा.कर प्रशासकीय अधिकारी विनायक साळुखे , अभियंता तेजस सुर्यवंशी , न.पा . विभागाचे अजय नरळे , ग्रामसेवक गोरख जगताप , एम.जी.पवार व इतर न.पा. कर्मचारी , पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज