मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापुरातील कोरोना बाधिताची संख्या आता 135 झाली आहे.तर मृतांची संख्या आठ वर पोहोचली आहे.जिल्हा प्रशासनाने आज सोमवारी सायंकाळी 7 वाजता ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
आतापर्यंत मृतांची संख्या 8 झाली आहे. आजच्या अहवालात दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
आत्तापर्यंत सोलापुरात 2258 जणांचे कोरोना साठी स्वॅब घेण्यात आले. यातील 2003 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात 1868 निगेटिव्ह तर 135 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.
आज एका दिवसात 116 अहवाल प्राप्त झाले यात 109 निगेटिव्ह तर 7 पॉझिटिव्ह आहेत .आज 2 पुरुष आणि 5 महिला यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यातील यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
आजचे सात रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले त्यात नई जिंदगी दोन महिला ,शास्त्रीनगर एक महिला, न्यू पाच्छा पेठ एक महिला, देगाव एक पुरुष, गेंट्याल चौक एक पुरुष, जोडभावी पेठ एक महिला.
कालपर्यंत मृतांची संख्या 6 होती. यात दोनची भर पडली आहे. मृतात एक 65 वर्षीय महिला न्यू पाच्छा पेठ भागातील आहे; तर पाटकुल येथील 26 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला 24 रोजी दाखल झाली होती 26 एप्रिल रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. कोरोना तून बरे झालेले आणखीन तीन रुग्ण आज घरी सोडण्यात आले.
———————
ब्रेकिंग व नवनवीन ताज्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज