टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 68.97 टक्के मतदान झाले असून ती गेल्या 2021 च्या तुलनेत तब्बल अडीच टक्क्याने वाढली आहे. गेल्या निवडणुकीत 66.15 टक्के मतदान झाले होते. हा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार, याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, भाजपकडून समाधान आवताडे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अनिल सावंत, काँग्रेसकडून भागीरथ भालके यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.
मंगळवेढा तालुक्यात सकाळच्या वेळेस अत्यंत कमी नागरिक मतदानासाठी येत होते दुपार नंतर मात्र गर्दी होऊ लागली होती. काही गावात रात्री आठ वाजेपर्यंत लोक लाईन मध्ये उभे होते.
दरम्यान, अनेक गावांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले आहे. तर 2021 च्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत तब्बल अडीच टक्के मतदान वाढल्या असून त्याचा फायदा कोणाला होणार हे उद्याच्या 23 नोव्हेंबरला समजणार आहे.
सांगोला मतदारसंघात सर्वाधिक मतदान ७३. ५९ टक्के मतदान झाले असून सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे ५३.५६ टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची ही आकडेवारी सायंकाळी सहापर्यंतची आहे. त्यानंतर झालेल्या मतदानामुळे या टक्केवारीमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढ होणार, हे निश्चित आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार होते, त्या पैकी २५ लाख १७ हजार ३७४ मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १३ लाख १७ हजार ३६४ पुरुष मतदार, तर ११ लाख ९९ हजार ९१२ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने मतदान केल्याचे स्पष्ट होते.
जिल्ह्यातील ११ मतदारसंघातून १८४ उमेदवार विधानसभा निवडणूक लढवित आहेत. मतदानाला आज सकाळी सातपासूनच सुरुवात झाली होती. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारीत वाढ झाल्याचे साधारणपणे सांगण्यात येत आहे.
विशेषतः जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर महिला मतदारांची मोठी रांग दिसून येत होती. सकाळच्या सत्रात थंडीचे प्रमाण होते, त्यामुळे शहरी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून येत होती. मात्र, ग्रामीण भागात सकाळपासून रांगा दिसत होत्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज