मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूरात बुधवारी सकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार सोलापुरात आज आणखी 5 अहवाल कोरोना पॅाझीटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे आता एकूण रुग्णांची संख्या 461 झाली आहे. तर एक पुरुष व एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी रात्री 126 जणांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पाच जणांचे रिपोर्ट हे पॅाझीटीव्ह आले आहेत. त्यामध्ये 1 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 4738 जणांच्या अहवालाची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 4277 जणांचा अहवाल हा निगेटीव्ह आला आहे.
आतापर्यंत एकूण 32 जणांचा मृत्यू झाला असून, एकूण 168 जण बरे होऊन घरी परतले आहेत.
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज