मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मोहोळ तालुक्यातील पाटकूल, ढोकबाभूळगाव व सावळेश्वर येथे एकाच दिवशी काल रविवारी कोरोनाचे प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने प्रशासनाने पाटकूल येथील 13, ढोकबाभूळगाव येथील 18 व सावळेश्वर येथील 22 अशा 53 नागरिकांना तपासणीसाठी ताब्यात घेऊन सोलापूर येथे पाठविले आहे.
दरम्यान, प्रशासनाने या गावाजवळील तीन किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तर सात किलोमीटरचा परिसर बफरझोन म्हणून घोषित केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य व पोलिसांची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सोलापूर शहराबरोबरच आता जिल्ह्यातील सांगोला तालुक्यानंतर मोहोळ तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला असून मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे 26 एप्रिलला एक रुग्ण आढळला होता.
त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर 10 मेला पाटकूल, ढोकबाभूळगाव व सावळेश्वर येथे कोरोनाचे प्रत्येकी एक रुग्ण (दोन पुरुष व एक स्त्री) आढळल्याने प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे आदींनी संबंधित गावांना भेट देऊन तत्काळ तेथे उपाययोजना राबविल्या. कोरनाबाधित रुग्णाला सोलापूर येथे तत्काळ पाठविण्यात आले व त्या तिघांच्या संपर्कात आलेल्या पाटकूल येथील 13, ढोकबाभूळगाव येथील 18 व सावळेश्वर येथील 22 नागरिकांना तपासणीसाठी सोलापूर येथे पाठवले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज