मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा येथे 3 व 4 ऑगस्ट रोजी होणार्या राज्यस्तरीय साहित्य-संगीत संमेलनास लवंगी ता.मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगर्सने 51 हजार रूपयाची देणगी दिली आहे.
सदरच्या देणगीचा धनादेश कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांनी संयोजन समितीचे सदस्य लहू ढगे यांचेकडे दिला आहे.
यावेळी संयोजन समितीचे सदस्य तथा म.सा.प.शाखा दामाजीनगरचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जडे, सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे, नाटय परिषद राज्य नियामक मंडळाचे सदस्य यतिराज वाकळे, कारखान्याचे सरव्यवस्थापक रविंद्र साळुंखे, ऊसपुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे, शेती अधिकारी शिवाजी चव्हाण आदि उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज