मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा शहरातील खोमनाळ नाका परिसरात राहणाऱ्या एक 18 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या पालकांनी पोलिसात केली असून पोलिस त्या तरूणीचा शोध घेत आहेत.दरम्यान 48 तासात दोन मुली बेपत्ता झाल्याने पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
दि. 29 रोजी 11.00 वा. शहरातील खोमनाळ नाका परिसरात असलेल्या घरातून यातील तरूणी ही कोणास काही न सांगता घरातून निघून गेली आहे. रंगाने गोरी,उंची 5 फुट,अंगाने मध्यम,चेहरा उभट,केस काळे,नाक सरळ,रंगात नेसनेस लाल टॉप व पिवळया रंगाची लेगीज अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या नजरेस आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक तपास पोलिस नाईक योगीराज खिलारे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज