मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढयाकडून कर्नाटक राज्यात जाणारी 4 लाख 50 हजार रुपयांची रक्कम मंगळवेढा पोलिसांनी कर्नाटक सीमेवर पकडली असून ही रक्कम पोलिसांनी हस्तगत करून कोषागार कार्यालयात जमा केली आहे. दरम्यान आयकर विभागाच्या अधिकार्यांकडून तपासणी झाल्यानंतरच ही रक्कम कशाची आहे हे समजणार आहे.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा व कर्नाटक सीमेलगत कात्राळ येथे तपासणी नाका असून दि.26 रोजी सायंकाळी 7.00 वा. एम एच 13 ए सी.ए. 5155 या हिरो होंडा कंपनीच्या मोटर सायकलवरून एक पुरुष व महिला चडचणकडे जात असताना पोलिसांना संशय आल्याने पोलिस नाईक विक्रम राठोड तसेच उत्पादन शुल्कचे फौजदार व इतर अन्य कर्मचार्यांनी मोटर सायकलची तपासणी केली असता बॅगेत रोख 4 लाख 50 हजार रुपयांचे बंडल होते.या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील,पोलिस निरिक्षक अनिल गाडे यंाचेशी संपर्क साधून पथकाने या पैशाबाबत माहिती दिली.
तहसीलदार स्वप्नील रावडे व सहाय्यक पोलिस निरिक्षक भगवान बुरसे यांनी घटनास्थळी जावून अधिक चौकशी केली. व ती रक्कम ताब्यात घेवून रात्री उशीरा मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये हजर केली. अधिक चौकशीमध्ये मोटर सायकलवरील विक्रम भोसले (वय 25) हे निमगाव टेंभूर्णी येथील असल्याचे निष्पन्न झाले. पैशाबाबत अधिक चौकशी केली असता ते चडचण येथे कपडे खरेदी करण्यासाठी जात असल्याचे सांगितले.दरम्यान पोलिसांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी ही रक्कम जप्त करून पंचासमक्ष फोटोग्राफी व पंचनामा करून शासकीय कोषागारामध्ये जमा केली आहे.
सध्या विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जवळ बाळगता येत नाही. 50 हजार रुपयांपेक्षा जादा रक्कम ने आण करावयाची असल्यास निवडणूक अधिकार्यांची परवानगी व त्याचे पुरावे असणे गरजेचे आहे. नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचे पालन मतदान होईपर्यंत करून पोलिस यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज