टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोंढारकी नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवसानिमित्त 33 जणांनी रक्तदान केले आहे.
या रक्तदान शिबिराचे चौथे वर्ष चालू आहे याचे उद्घाटन पुणे शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धाराशिव कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील होते.
याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष रामदास बाडगे, प्रगतशील बागायतदार समाधान गायकवाड, श्रीनिवास बनसोडे, प्रताप गायकवाड,
सामाजिक कार्यकर्ते बापू मोरे व शेगांव दुमामाचे माऊली अटकले, बंडू काटे, इंजि दुलावा बोरकर, गोपाळपूर पंढरपूरचे रवी विकास साळुंखे,अमर काळे तसेच नेहरू युवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुपारी १ वाजता गोपाळपुर वृद्धाश्रममध्ये ( मातोश्री ) वयोवृद्ध व्यक्तींना स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
याप्रसंगी लघु पाटबंधारे अधिकारी सोमनाथ देशमुख , अमर पाटील, विशाल सावंत, मयुर चव्हाण, मुन्ना सावंत शिवाजी दांडगे आदीजन उपस्थित होते.
अमर पाटील बोलताना म्हणाले की, राजेंद्र फुगारे यांनी व्यवसाय करत असताना सामाजिक कामाची आवड मात्र चांगलीच जोपासली आहे. गेल्या चार वर्षापासून ते न चुकता वाढदिवसा दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करत आहेत.
राजेंद्र फुगारे यांच्यामुळे परिसरातील अनेक तरुणांना हाताला काम मिळाले मिळाले असल्याचे कार्यकारी संचालक पाटील यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज