
टीम मंगळवेढा टाईम्स । भारतात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. एकूण रुग्णांची संख्या 31 लाखांवर गेली आहे. भारत हा तिसरा देश आहे जिथे 30 लाखाहून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. यापूर्वी अमेरिका आणि ब्राझीलमध्ये 30 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात जगातील 26 टक्के प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत.
वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगात कोरोना रूग्णांची संख्या 2 कोटी 38 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये 8 लाख 17 हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 63 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या 66 लाखाहून अधिक आहे.
24 ऑगस्ट रोजी जगात 2 लाख 13 हजार नवीन रुग्ण आढळले, त्याच दिवशी भारतात नवीन रूग्णांची संख्या 59 हजाराहून अधिक होती. त्याचप्रमाणे 23 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2 लाख 10 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली, तर भारतात नवीन रूग्णांची संख्या 61 हजाराहून अधिक आहे.
22 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2 लाख 67 हजार रुग्ण संख्या नोंदवली गेली होती, तर एकट्या भारतात 70 हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2 लाख 58 हजार प्रकरणे नोंदवली गेली, तर केवळ भारतात 69 हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली. 20 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2.67 लाख प्रकरणे नोंदवली गेली, तर भारतात 68 हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली.
संपूर्ण जगात येणाऱ्या चार रुग्णांपैकी एक रुग्ण भारतातला आहे. भारतातील एकूण रूग्णांची संख्या आता 31 लाख 67 हजारांच्या पलीकडे गेली आहे, ज्यामध्ये 58 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 24 लाखाहून अधिक लोक बरे झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखाहून अधिक आहे.
26% of the world’s new corona patients are from India



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












