मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ठिबक सिंचनसाठी 25 हजार शेतकर्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख गुरुवारी 20 फेब्रुवारी असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी दिली.
गतवर्षी दुष्काळ असल्यामुळे ठिबक सिंचन करण्याकडे शेतकर्यांचा कल तितका नव्हता. परंतु, यंदा जिल्ह्यात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे ठिबक सिंचन करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. जिल्ह्यातील बरेच शेतकरी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात कमी पाण्यात ठिबकद्वारे पिके घेता येऊ शकतात.
शासनाने ठिबक सिंचन करणार्या शेतकर्यांना 80 टक्के अनुदान केल्यामुळे ठिबक सिंचन करण्याकडे शेतकर्यांचा कल अधिक असल्याचे दिसत आहे. हे अनुदान देताना शासनाकडून सुरूवातीला 45 टक्केव नंतर उर्वरीत अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. आतापर्यंत अर्ज केलेल्या 21 हजार 77 शेतकर्यांना पूर्वसंमतीचे पत्र देण्यात आले आहे. तर 4 हजार 162 शेतकर्यांना पूर्व संमती दिल्यानंतर त्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्यात आले आहे.
सर्वाधिक ठिबक सिंचनासाठी बार्शी तालुक्यातून 4266 शेतकर्यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर अक् कलकोट 1015, करमाळा 2816, माढा 3670, माळशिरस 843, मंगळवेढा 1839, मोहोळ 2838, पंढरपूर 3433, उत्तर सोलापूर 867 व दक्षिण सोलापूर 1511 असे एकूण 25956 शेतकर्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज