मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्यास सुरुवात झाली. चीन पाठोपाठ इटली, स्पेन, अमेरिका अशा अनेक मोठ्या देशांहस 181 देशांना कोरोनाचा विळखा आहे. या देशांमध्ये अक्षरश: कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव आता वेगानं वाढत असल्याचं समोर आलं आहे. भारतालाही कोरोना व्हायरसचा मोठा धोका आहे. याचं कारण म्हणजे कोरोनाग्रस्तांची संख्या आता वेगाानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ओडीसानं आधीच 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. तर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील 15 जिल्हे पूर्ण सील केले आहेत. भारतात आतापर्यंत 7 हजार 500 हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ह्या व्हायरसमुळे 250 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय ओडीसा पाठोपाठ पंजाबनेही घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 किंवा 12 एप्रिलपर्यंत या संदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 24 तासांत 32 रुग्णांचा मृत्यू तर 896 नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत.
सध्या महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1574 पर्यंत पोहोचली असून मृत्यूंचा आकडा 110 पर्यंत पोहोचला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या खूप जास्त आहे. यातही सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 1008 पर्यंत पोहोचली आहे. त्यातही पुण्यात 254, कोल्हापूर 37, अकोला 34 आणि नागपूरात 26 रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार सध्या राज्याची संख्या 1574पर्यंत पोहचली आहे. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा असून वेळीत नागरिकांनी सावध राहणं आवश्यक आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे जगभरात 1 लाख 90 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 16 लाख 38 हजार 216 लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. जगभरात 3 लाख 69 लाख लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येनं रेकॉर्ड ब्रेक केला आहे. एका दिवसात 2 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांत एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू जगात पहिल्यांदाच घडला आहे. अमेरिका असा पहिला देश आहे जिथे आतापर्यंत सर्वात जास्त म्हणजे 18 हजार 849 रुग्णांचा कोरोनानं बळी घेतला आहे.
इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे 18 हजार 800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 39 हजार 400 लोकांना लागण झाली आहे. तर अमेरिकेमध्ये 16 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटली, स्पेन, अमेरिकेला सर्वात जास्त कोरोनाचा धोका आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार बंद असल्यानं आर्थिक नुकसान झालं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज