mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Lockdown : मुख्यमंत्र्यांसोबतच्या ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’मध्ये पंतप्रधान मोदींनी मांडलेले २१ महत्त्वाचे मुद्दे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Lockdown : मुख्यमंत्र्यांसोबतच्या ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’मध्ये पंतप्रधान मोदींनी मांडलेले २१ महत्त्वाचे मुद्दे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. याआधी मोदींनी तीन वेळा सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता. गेल्या तीन बैठकांमध्ये फारशी संधी न मिळालेल्या मुख्यमंत्र्यांना यावेळी प्राधान्यानं बोलण्याची संधी देण्यात आली. या बैठकीत मोदींनी २१ महत्त्वाचे मुद्दे मांडले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?


१. कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते, आज ७ ते ८ आठवड्यांनी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे.याशिवाय मृतांचा आकडादेखील कितीतरी जास्त आहे.

२. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली. जनतेनेदेखील साथ दिली. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला, ते आपण पाहतोय.

३. पण भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे.

४. आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणायचे आहे. परदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे. त्यांना लगेच चाचण्या करून क्वारंटाईन करायचे आहे.

५. लॉकडाऊन कुठे कडक आणि कुठे शिथिल करायचे ते राज्यांनी विचार करून ठरवायचे आहे.

६. कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. “दो गज दूरी” हा आपला जीवनाचा मंत्र बनवा आणि आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हेदेखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहेत हे लक्षात घ्या.

७. लॉकडाऊनही राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असा समतोल ठेवणारे धोरण तयार करा.

Today was the 4th interaction with CMs. We continued discussions on COVID-19 containing strategy as well as aspects relating to increased usage of technology, reforms and more. https://t.co/xB7pnjmh2P

— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2020

८. एका बाजूला आपल्याला कोरोनाचा मुकाबला करायचा आहे तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार गतीने सुरु करायचे आहेत.

९. ३ मे ही दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.

१०. संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही यासाठी आटोकाट प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा.

११. पुढे जाऊन रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी गोष्टींचा यात समावेश असेल.

१२. मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत. पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा. संक्रमित व्यक्तींचे संपर्क जास्तात जास्त तपासा.

१३. सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत

१४. येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज. असे झोन्स फुल प्रुफ करा.

१५. ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका.

१६. कोरोनशिवाय इतर आजारांचा सामना कराव्या लागणाऱ्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेत.

१७. ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे, तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार.

२० एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली. पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा.

१८. रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोनमध्ये कसे जायचे याचे नियोजन आवश्यक आहे.

१९. सुधारणा घडवण्याची हीच सुसंधी आहे. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल.

२०. प्रत्येक राज्याने सुधारणांवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला.

२१. तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.

————————–

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Desh-videshLatest NewsSamajik

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
Breaking : सोलापूरात 4 नवे कोरोना पॉझिटिव्ह एकूण संख्या 65 वर

Breaking : सोलापूरात 4 नवे कोरोना पॉझिटिव्ह एकूण संख्या 65 वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ! महाविदयालयात परीक्षेस आलेली १९ वर्षीय मुलगी मंगळवेढ्यातून बेपत्ता; ‘या’ वर्णणाची मुलगी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा पोलीसांशी संपर्क साधा

June 28, 2025
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

वाहनधारकांनो! वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही केले, तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार, दरदिवशी होणार ‘एवढा’ रुपये दंड

June 28, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

धर्म आणि जातीच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन; एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 28, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा