टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहर ग्रामीण पोलीस आस्थापनेवर उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पोलीस दलातील सोळा अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले आहे.
याची घोषणा गृहविभागाने १ मे च्या पूर्वसंध्येला एका पत्रकान्वये केली आहे. राज्यभरातील ८०० पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांपैकी १७ जण सोलापुरातील आहेत.
आज १ मे रोजी सकाळी पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व पोलीस आयुक्त हरीश बैजल , पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव,
पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर , डॉ.दिपाली घाटे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी, कर्मचारी याप्रमाणे समावेश पोलीस आयुक्तालय : प्रिती प्रकाश टिपरे , सहा पोलीस आयुक्त गुन्हेशाखा , सोलापूर शहर , डॉ . संतोष बापूराव गायकवाड , ( सहा . पोलीस आयुक्त , सोलापूर शहर ) ,
हिंदूराव अंबादास पोळ ( पोलीस हवालदार , सोलापूर शहर ) , नवनीत घाळेप्पा नडगेरी ( पोलीस हवालदार , गुन्हेशाखा , सोलापूर शहर ) , दिपक गुलाबराव घाडगे , ( पोलीस नाईक , सोलापूर शहर अल्फान शादुल्ला सय्यद , ( पोलीस नाईक , सोलापूर शहर ) ,
अभिनित सदाशिव कोष्टी , ( पोलीस नाईक अॅन्टीकरप्शन विभाग , सोलापूर ) , सिध्दाराम लक्ष्मण गवळी ( गुप्त वार्ता अधिकारी , सोलापूर ) ,
सोलापूर ग्रामीण पोलीस : मोहन शामकर्ण मनसावले (पोलीस हवलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), अरुण ज्ञानदेव फुगे ( पोलीस निरीक्षक , सोलापूर तालुका पोलीस ठाणे ) , धनंजय चित्तरंजन पोरे ( सहाय्यक पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा ),
अब्दुल हमीद याकुब शेख (पोलीस उपनिरीक्षक) , नागेश तुकाराम गायकवाड (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) , नीलकंठ भालचंद्र जाधवर ( सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा ),
संजय विठोबा कवचाळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ), सलीम हुसेन बागवान (पोलीस हवालदार) संतोष विश्वनाथ म्हेत्रे पोलीस हवालदार आदींचा समावेश आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज