टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरात दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या ही वाढतच आहे. त्यातच आता आज सायंकाळी 7.30 वाजता प्राप्त झालेल्या माहितीनुसार, करोनाबाधित 16 नव्या रूग्णांची भर पडली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता 63 झाली आहे. तर एकूण रूग्णसंख्याही 624 वर पोहोचली आहे.
आज सायंकाळी 151 जणांची चाचणी अहवाल प्राप्त होऊन त्यात 6 महिला व 10 पुरुषांना करोनाने बाधित केल्याचे दिसून आले. एकूण रूग्णसंख्येमध्ये 345 पुरूष आणि 279 महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 39 पुरूष व 24 महिला आहेत. मात्र आतापर्यंत 279 रूग्ण करोनामुक्त झाले आहेत.
आतापर्यंत आढळून आलेले रूग्ण प्रामुख्याने शहरातील असून झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे आहेत.
आज ज्या व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या त्यांचे विभाग पुढीलप्रमाणे – गीतानगर 1 पुरूष. दाजीपेठ 1 पुरुष 3 महिला. न्यू बुधवार पेठ 1 पुरूष. रेल्वे लाईन 1 पुरूष. बाळीवेस 2 पुरूष, 1 महिला. भवानी पेठ 1 पुरूष. मराठा वस्ती भवानी पेठ 1 पुरूष. एमआयडीसी रोड 1 पुरूष. पाच्छा पेठ 1 महिला. कुमठा नाका 1 पुरूष. जामगाव बार्शी 1 पुरूष.
मृत व्यक्तींची माहिती
पुढीलप्रमाणे – 74 वर्षीय पुरूष कुर्बानहुसेन नगर परिसर. 72 वर्षीय पुरूष कर्णिकनगर परिसर. 60 वर्षीय महिला उत्तर कसबा. 70 वर्षीय महिला जुना विडी घरकुल. 61 वर्षीय पुरूष समाधाननगर अ.कोट रोड. आत्तापर्यंत 63 व्यक्तींचा मृत्यू झाला असून यात 39 पुरूष तर 24 महिलांचा समावेश आहे
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज