टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागेसाठी दाखल झालेल्या १४५ अजापैकी १० उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. उमेदवारी मागार घेतल्यानंतर रिगंणातील उमेदवार स्पष्ट होणार आहेत..
नामंजूर करण्यासाठी व्यापारी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असताना शेतकरी म्हणून अर्ज दाखल करणे, दोन उमेदवारांची एकच अनुमोदक असणे,
उमेदवारी अर्जासोबत शेतकरी असल्याचा पुरावा न जोडणे, अर्जासोबत योग्य ते आवश्यक दाखले न जोडणे या कारणांसाठी अर्ज अवैध ठरविण्यात आले. यावर अपील करण्यासाठी कालावधी देण्यात आला आहे.
एक हजार ७६३ सभासद असणाऱ्या मंगळवेढा मार्केट कमिटीची २०२२ अखेर ८५ कोटीची वार्षिक उलाढाल आहे. संस्था मतदारसंघात ४६ उमेदवारी अर्ज,
महिला जागेसाठी १३, इतर मागासवर्गीय -१३, भटक्या विमुक्त जाती- १२ असे ११ जागेसाठी एकूण ८४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
ग्रामपंचायत प्रवर्गामध्ये २७ जणांनी उमेदवारी अर्ज, ग्रामपंचायत अनुसूचित जाती मध्ये १५ जणांनी आणि आर्थिक दुर्बल मध्ये ८ असे एकूण ४ जागेसाठी ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले.
व्यापारी मतदारसंघात २ जागेसाठी ७ जणांनी उमेदवारी अर्ज केले आणि हमाल तोलारच्या १ जागेसाठी ४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
या उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये झाले नामंजूर
बसवंत पाटील, बसवंत बिराजदार, रामेश्वर मासाळ, लक्ष्मण धसाडे, भीमराव येडवे, सुमैय्या तांबोळी, श्रीमंत केदार हे संस्था मतदारसंघात आणि श्रीमंत केदार, रत्नाकर बनसोडे, दौलत माने हे ग्रामपंचायत मतदारसंघातून अपात्र झाले. २० एप्रिल रोजी अर्ज माघारी घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज