mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 21, 2022
in राजकारण, राज्य
शिवसेनेत खळबळ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टेन्शन वाढले; मंत्री एकनाथ शिंदेंसह १३ आमदार नॉटरिचेबल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे.

भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. असं असूनही भाजपाने विजय खेचून आणला आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीचे अनेक आमदार फुटल्याची माहिती देखील समोर येत आहे.

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर आणि आमश्या पाडवी विजयी झाले.

मात्र या विजयानंतर सचिन आहिर वगळता शिवसेनेच्या एकही बड्या नेत्याने माध्यमांशी संवाद साधला आहे.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रक्रियेपासूनच अलिप्त असल्याचं सोमवारी दिवसभरात दिसून आलं.

मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासह १३ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई आणि आसपसच्या आमदारांनी तर रात्रीच वर्षावर बंगल्यावर हजेरी लावली. मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती.

शिवसेनेतली धुसफूस लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील वर्षा या निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली.

एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होता, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांची दुपारी १२ वाजत बैठक बोलावली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदार हजेरी लावणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.

या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला.

काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. खरे पाहता काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते.

भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात खरी लढत झाल्याचे सांगितले जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला.(स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिवसेना

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

भिगवण तरुणी अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणीचा रवानगी सुधारगृहात; आता तरुणाचं काय होणार? तरुणीचे धक्कादायक शपथपत्र

February 21, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यातील सहा विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले, पालक चिंताग्रस्त; विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी आ.आवताडेंचे प्रयत्न सुरू

सरकार संकटात! नॉट रिचेबल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट; 17 आमदार बंडाच्या तयारीत? सोलापूर जिल्ह्यातील 'या' आमदाराचा समावेश

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 27, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 27, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा