टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून शनिवारी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालात तालुक्यात 121 जणांना कोरोनाची लागण तर तालुक्यातील बठाण येथील 17 वर्षीय मुलगा व दामाजीनगर येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. यामध्ये वाढत्या रुग्णांबरोबर मृत्यूची संख्याही वाढत चालली आहे. शनिवारी जिल्ह्यात 33 जणांचा कोरोनामुळे एकाच दिवशी मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 16, तर ग्रामीण भागातील 17 अशा 33 जणांचा समोवश आहे. 1 हजार 389 नव्या रुग्णांची भर पडली आहे. आणखी 820 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
शनिवारी ग्रामीण भागातील 9 हजार 337 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 हजार 200 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 1137 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. 522 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत
सोलापूर शहरातील 3 हजार 524 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 272 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 252 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 110 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांमध्ये
मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील 17 वर्षीय पुरुष, दामाजीनगर येथील 55 वर्षीय पुरुष,माळशिरस तालुक्यातील बिजवडी येथील 50 वर्षीय स्त्री, श्रीपूर येथील 55 वर्षीय पुरुष, माढा तालुक्यातील मोडनिंब येथील 47 वर्षीय पुरुष, टेंभुर्णी येथील 62 वर्षीय पुरुष, कुर्डूवाडी येथील 55 वर्षीय स्त्री, पिंपळखुटे येथील 48 वर्षीय पुरुष, वडोली येथील 70 वर्षीय पुरुष,
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी येथील 70 वर्षीय पुरुष, मोहोळ तालुक्यातील बुधवार पेठेतील 80 वर्षांचे पुरुष, समर्थनगर येथील 75 वर्षांची स्त्री, वाळूज देगाव येथील 60 वर्षीय पुरुष, क्रांतीनगर येथील 71 वर्षीय पुरुष, पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील 50 वर्षांची महिला,
बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील 81 वर्षीय पुरुष, वैराग येथील 60 वर्षीय पुरुष, विजापूर रोड शांतीनगर येथील 80 वर्षीय पुरुष, सुशीलनगर येथील 45 वर्षीय पुरुष, जुने विडी घरकूल येथील 62 वर्षीय महिला, एमआयडीसी परिसरातील 38 वर्षीय महिला व 74 वर्षीय पुरुष, तिर्हेगाव फॉरेस्ट येथील 62 वर्षीय पुरुष,
जुळे सोलापूर येथील 68 वर्षीय महिला, शुक्रवार पेठेतील 64 वर्षीय पुरुष, वसंतविहार येथील 57 वर्षीय पुरुष, विजयनगर येथील 61 वर्षीय पुरुष, लक्ष्मी पेठ येथील 57 वर्षीय महिला, नई जिंदगी येथील 47 वर्षीय पुरुष, मोदी खाना येथील 64 वर्षीय महिला, जलजलारामनगर येथील 65 वर्षीय महिला, जुळे सोलापूर येथील 59 वर्षीय महिला, दमाणीनगर येथील 68 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे.
आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 57 हजार 88, तर शहरातील 21 हजार 289, असे एकूण 78 हजार 377 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील 1379, तर शहरातील 891, अशा एकूण 2270 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 7 हजार 400,
तर शहरातील 3 हजार 506, अशा एकूण 10 हजार 906 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 48 हजार 309, तर शहरातील 16 हजार 892, असे एकूण 65 हजार 201 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज