mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

CoronaVirus : अन्य जिल्हयातून मंगळवेढयात 11 हजार 941 नागरिक आल्याची प्रशासनाकडे नोंद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
CoronaVirus : अन्य जिल्हयातून मंगळवेढयात 11 हजार 941 नागरिक आल्याची प्रशासनाकडे नोंद

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा तालुक्यात परजिल्हयातून आत्तापर्यंत जवळपास 11 हजार 941 नागरिक आल्याची नोंद प्रशासनाकडे झाली असून त्यांची तपासणी करून पाठविण्यात आले आहे.दरम्यान ग्रामीण भागासाठी  बालाजीनगर येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून येथे जवळपास 26 लोकांना या कक्षात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.अत्यावश्यक सेवेतील 30 वाहन चालकांची तपासणी करण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्हयालगत असलेल्या सांगली , सातारा, पुणे, उस्मानाबाद,बीड यासह अन्य जिल्हयातून मंगळवेढयात आत्तापर्यंत 11 हजार 941 नागरिक आल्याची प्रशासनाकडे नोंद झाली आहे.या आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे.बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर लक्ष आरोग्य विभाग ठेवून आहे.नव्याने येणार्‍या व्यक्तीची तात्काळ तपासणी केली जात आहे.

मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाकडे आत्तापर्यंत 613 जणांना तपासण्यात आले आहे.मंगळवेढा शहरात आलेल्या लोकांसाठी श्री संत दामाजी महाविदयालय व मदनसिंह मोहिते पाटील महाविदयालय या दोन ठिकाणची कोरोंटाईन केअर सेंटर उभारणी करण्यासाठी जागेची पाहणी करण्यात आली असून त्यापैकी एका ठिकाणी लवकरच कोरोना केअर सेंटर उभारले जाणार आहे.

ग्रामीण भागातील बोराळे , भोसे, आंधळगांव, मरवडे,सलगर बु या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आत्तापर्यंत 11 हजार 941 नागरिक परजिल्हयातून मंगळवेढयात आल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली आहे.या सर्व बाहेरून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. आजमितीला एकही मंगळवेढा तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोना या संसर्गजन्य आजाराला अटकाव करण्यासाठी लॉकडाऊन केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या 30 वाहन चालकाना परवानगी देण्यात आली होती.या सर्व वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. या चालकांना त्यांच्या स्वतःच्या घरात विलगीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

ग्रामीण भागासाठी बालाजी नगर येथील आश्रमशाळेत कोरंटाईन केअर सेंटर उभारण्यात आले आहे.येथे जवळपास 26 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. हे सर्व नागरिक बाहेरच्या जिल्हयातून आलेले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था बालाजी शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.सकाळी नाष्टा,दोन टाईम जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यांच्या सुरक्षेसाठी एक होमगार्ड,एक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आला आहे.

———–

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Samajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
#Lockdown : गृह मंत्रालयाची गाईडलाईन जाहीर, फक्त यांना सवलत

#Lockdown : गृह मंत्रालयाची गाईडलाईन जाहीर, फक्त यांना सवलत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा