मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
हवामान विभागाने राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे पत्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.
तसेच गुरूवारी दि. २० राेजी हाेणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे पेपरही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
राज्यात गत दाेन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला असून हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याअनुषंगाने पावसामुळे मुलांची शाळेत जाण्या-येण्याची गैरसोय होउ शकते
त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षण आयुक्तांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या जिल्ह्यातील पावसाची स्थिती पाहून शाळेला सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा असे शिक्षण आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे.
दहावी,बारावी पुरवणी परिक्षा पुढे ढककल्या
हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर आज दि. २० जुलै राेजी हाेणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावी च्या पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे.
गुरूवारी हाेणारा दहावीचा पेपर येत्या २ ऑगस्ट तर बारावीचा पेपर दि. ११ ऑगस्ट राेजी हाेतील अशी माहिती राज्य मंडळाच्या वतीने देण्यात आली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज