mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

श्री.सदगुरू सिताराम महाराज अर्बन बँकेत पहिल्याच दिवशी १ कोटी १ लाख ठेवी जमा; विश्वासावरच धनश्री व सिताराम परिवाराने सहकार क्षेत्रात नावलौकिकता मिळवली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 22, 2022
in मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

स्पर्धेच्या युगात धनश्री परिवार व सिताराम परिवाराने लोकांमध्ये विश्वास निर्माण करून सहकार क्षेत्रात नावलौकिकता मिळवली आहे. हे खऱ्या अर्थाने धनश्री व सिताराम परिवारातील आर्थिक संस्थेचे यश आहे. असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले.

धनश्री परिवार व सिताराम परिवारातील श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेचा उद्घाटन सोहळा शिवप्रेमी चौक, शिवालय शेजारी मंगळवेढा येथे ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुंदन भोळे बोलत होते.

दरम्यान संस्थेत पहिल्याच दिवशी १ कोटी १ लाख ठेवी जमा झाल्या असून पहिल्याच दिवसात १ कोटीचा टप्पा पार करणारी मंगळवेढा तालुक्यातील एकमेव पहिलीच संस्था म्हणुन श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा ही ठरली आहे.

याप्रसंगी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा. चेअरमन तानाजी खरात, उद्योजक वैभव नागणे, सांगोला सूतगिरणीचे माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे,

माजी आमदार दत्तात्रय सावंत, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक अनिल सावंत, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर बी.एस. माने, भीमा शुगरचे व्हा. चेअरमन सतीश जगताप, रतनचंद शहा बँकेचे व्हा. चेअरमन रामचंद्र जगताप, जिजामाता परिवाराचे रामकृष्ण नागणे,

जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव, धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, धनश्री मल्टीस्टेटचे व्हा. चेअमन युवराज गडदे, संचालक यादाप्पा माळी, धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभा काळुंगे, धनश्री मल्टीस्टेटच्या संचालिका उषा माने,

श्री सदगुरू सिताराम महाराज शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड, श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन सोसायटीचे व्हा. चेअरमन लक्ष्मण वाघमोडे, संचालिका राधिका पाटील, सीमाताई काळुंगे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

पुढे कुंदन भोळे म्हणाले, सहकार क्षेत्रात कार्यरत असताना संचालक मंडळाने सर्व कायदेशीर बाबी समजून घेऊन बँकचे कामकाज करणे नितांत गरजेचे आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा मानस असावा.

सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत धनश्री व सिताराम परिवाराने वाटचाल सुरू ठेवली आहे. एकीकडे देशाला आदर्श असणारे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आज ग्रामीण विकासापासून ते राष्ट्रीय विकासापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहे.

त्याचाच एक भाग मंगळवेढाच्या वैभवशाली विकासात धनश्री परिवारातील धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटचा मोठा हातभार आहे.

त्यामध्ये आणखी भर घालण्यासाठी शिवाजीराव काळुंगे व शोभा काळुंगे यांनी आपल्या सहकार्यासोबत ही नवीन श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा संस्था उभा केली आहे. सर्वजण मनापासून कष्ट घेतात म्हणून अधिककाधिक व्यापारी आणि शेतकरी आपल्या संस्थेकडे वळाले आहेत.

ठेवीदार, कर्जदार, सभासद व ग्राहकांच्या विश्वासावरच धनश्री परिवार व सिताराम परिवाराने नावलौकिक मिळवला. असे गौवोद्गार काढत सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी धनश्री परिवार व सिताराम परिवाराचे अर्थिक क्षेत्रातील कामाचे कौतुक केले.

ह.भ.प. जयवंत बोधले महाराज म्हणाले, समाजकल्याणाच्या माध्यमातून लोककल्याणाचा मार्ग प्रशस्त करणारे सहकाराचा महामेरू म्हणजे प्रा.शिवाजीराव काळुंगे हे आहेत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश आपल्याला नक्की मिळेल.

या उक्तीप्रमाणे धनश्री परिवाराने मंगळवेढा तालुक्यामध्ये भरीव योगदान दिले आहे. असे सांगत त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओवीचा दाखला देत जोडोनिया धन उत्तम व्यवहारे…

संत तुकाराम महाराजांनीही परमार्थ सांगताना जीवनार्थ सोडून द्यायला सांगितला नाही. धन जमविलेच पाहिजे. केवळ ते उत्तम मार्गाने मिळवावे, असा उपदेश अभंगातून केला आहे. जे धन तुम्ही जोडणार आहात ते उत्तम व्यवहारातून जमविलेले असावे. असे संत वाणीचे विविध दाखले देत धनश्री परिवार व सिताराम परिवाराचे अर्थिक व सहकार क्षेत्रातील कामाचे कौतुक केले.

याप्रसंगी माजी आमदार दत्तात्रय सावंत, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, प्रा शिवाजीराव काळुंगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सदगुरू सिताराम महाराज शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांनी केले.

यावेळी जिल्हा नियोजन मंडळ समितीचे सदस्य अजित जगताप, दामाजी शुगरचे संचालक गौरीशंकर बुरकुल, बाळासाहेब गडदे, अमोल कोरके, पंडीत भोसले, प्रभाकर कलुबर्मे, अविनाश चव्हाण, माऊली काळे, धर्मराज खेडेकर,ॲड. शैलेश हावनाळे, ॲड. दत्तात्रय सरडे, सतीश दत्तु, प्रकाश काळुंगे, लहू ढगे, औदुंबर वाघ, महादेव शिखरे,

श्री सद्गुरू सिताराम महाराज शुगरचे कार्यकारी संचालक हणमंत पाटील, श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन सोसायटीचे संचालक बबन सरवळे, सागर मिसाळ, संजय चौगुले, राजेंद्र वाघमारे, ज्ञानेश्वर कांबळे, चंद्रकांत वेदपाठक,

धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांचेसह धनश्री महिला पतसंस्थेतील व धनश्री मल्टीस्टेटचे सर्व शाखाधिकरी,

श्री सदगुरू सिताराम महाराज शुगरचे सर्व विभाग प्रमुख तसेच पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला या भागातील सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी इंद्रजित घुले व अक्षय टोमके यांनी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: श्री सदगुरु सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 11, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धू-धु धुतले! जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकावर पीव्हीसी पाइपने मारहाण; खिशातून जबरदस्तीने काढले पैसे; मंगळवेढा तालुक्यातील घटना

September 11, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

खळबळ! अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या मंगळवेढ्यातील ‘या’ ५ वाळू माफियांवरती गुन्हा दाखल; महसूल व पोलिसांच्या पथकाची कारवाई

September 11, 2025

धक्कादायक! प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवेढ्यातील महिलेचा मृत्यू; डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा

September 11, 2025
काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

September 10, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांनो! ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, या रस्त्यांचे सीमांकन होऊन विशिष्ट क्रमांक येणार; मंगळवेढा तालुक्यात आजपासून शिवार फेरीचे आयोजन

September 10, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मुलांना सरकारी शाळेत शिकवल्यास करामध्ये मिळणार ५०% सूट; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

September 9, 2025
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

चोरटे शिरजोर! पाणी पिण्याचा बहाणा करुन एका वृध्द महिलेचे ८० हजाराचे दागिने लुटले; मंगळवेढा तालुक्यातील खळबळजनक घटना

September 8, 2025
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात मोबाईल नंबर टाकून उद्या स्वतः उपस्थित रहावे; आ.आवताडे यांनी केले आढावा बैठकीचे आयोजन

September 7, 2025
Next Post
आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; विद्यार्थ्यांना ‘इतक्या’ हजार वह्या व शैक्षणिक साहित्यांचे वाटप होणार

नेतृत्वाचा वरचष्मा! मंगळवेढा तालुक्यातील बोराळे ते कागष्ट रस्त्यासाठी 'इतके' कोटी रुपये मंजूर; आ.आवताडे यांची माहिती

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

September 11, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धू-धु धुतले! जुन्या भांडणाचा राग मनात धरून युवकावर पीव्हीसी पाइपने मारहाण; खिशातून जबरदस्तीने काढले पैसे; मंगळवेढा तालुक्यातील घटना

September 11, 2025
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

खळबळ! अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या मंगळवेढ्यातील ‘या’ ५ वाळू माफियांवरती गुन्हा दाखल; महसूल व पोलिसांच्या पथकाची कारवाई

September 11, 2025

धक्कादायक! प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवेढ्यातील महिलेचा मृत्यू; डॉक्टरसह सेविकेवर गुन्हा

September 11, 2025
काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

September 10, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत मोठा निर्णय झाला; गुन्हे मागे घेण्यासाठी आता नवा निकष

September 10, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा