टीम मंगळवेढा टाईम्स ।
राज्यातील 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण 30 सप्टेंबर रोजी ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केले त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित झाले आहे. अध्यक्ष पदाचे आरक्षण पडले.
मात्र निवडणुका संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला दिसत नाही. येत्या काही काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ७६७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षंपद नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या अनेकांचे मनसुबे उधळले असून अध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीमुळे यांपूर्वी गट-गणाची झालेली आरक्षणे अंतिम मानली जात आहेत.
राज्य निवडणूक आयोगानं ग्रामविकास विभागाला मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या सूचना दिल्या होत्या.
एकीकडे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांची सुनावणी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना दुसरीकडे ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आल्याने आता लवकरच प्रक्रिया सुरू होण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदांचे आरक्षण एका क्लीकवर
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत सुरु आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा, प्रभाग रचनेचा मुद्दा, राज्यातील सत्तांतर त्यानंतरची बदललेली राजकीय स्थिती त्यामुळं राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
अशातच आता जिल्हा परिषदांच्या आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. पहा आपल्या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाले.
जिल्हानिहाय आरक्षण
ठाणे : सर्वसाधारण
पालघर : अनुसूचित जमाती
रायगड : सर्वसाधारण
रत्नागिरी :नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .
सिंधुदुर्ग : सर्वसाधारण .
नाशिक : सर्वसाधारण (महिला) .
धुळे : सर्वसाधारण (महिला) .
जळगाव : सर्वसाधारण .
अहमदगर :अनुसूचित जमाती .
नंदुरबार : अनुसूचित जमाती (महिला) .
पुणे : सर्वसाधारण .
सोलापूर :नागरिकांचा मागास प्रवर्ग .
सातारा : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला) .
सांगली :सर्वसाधारण (महिला) .
कोल्हापूर : सर्वसाधारण (महिला) .
औरंगाबाद : सर्वसाधारण .
बीड : अनुसूचित जाती .
भंडारा : अनुसूचित जमाती (महिला) .
गोंदिया : नागरिकांचा मागस प्रवर्ग .
गडचिरोली : नागरिकांचा मागस प्रवर्ग (महिला) .
नांदेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग .
उस्मानाबाद : सर्वसाधारण (महिला .)
जालना : नागरिकांचा मागस प्रवर्ग .
लातूर : सर्वसाधारण( महिला) .
हिंगोली : सर्वसाधारण (महिला) .
अमरावती : सर्वसाधारण (महिला) .
अकोला : सर्वसाधारण (महिला) .
यवतमाळ : सर्वसाधारण .
बुलढणा : सर्वासाधारण .
वाशिम : सर्वसाधारण .
नागपूर अनुसूचित जमाती .
वर्धा : अनुसूचित जाती (महिला) .
चंद्रपूर :अनुसूचित जाती (महिला).
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज