टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतातील विद्युत पेटीतील प्रवाहाचा धक्का लागून ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाली. ही घटना २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या रामहिंगणी गावच्या हद्दीत पाटील वस्तीवर घडली.
राजवर्धन नारायण पाटील असे मृताचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान शेतातील बोरच्या लाइटच्या पेटीजवळ राजवर्धनला विद्युत प्रवाहाचा धक्का लागून तो पडला.
त्यावेळी त्याची पत्नी त्या ठिकाणी गेली असता तो खाली पडलेला दिसला. तिने तत्काळ घराकडे जाऊन दीर हर्षवर्धन पाटील यांना माहिती दिली.
राजवर्धन पाटील व जीवनधर मासाळ या दोघांनी त्याला तत्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात आणले, असता डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल थिटे करीत आहेत. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज