टीम मंगळवेढा टाईम्स।
भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकरी जगला तर देश जगेल अशी अवस्था, असताना या देशात जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचीच लुट केली जाते हे आता सहन केले जाणार नाही.
याविषयी सर्वच लोकप्रतिनीधींनी आवाज उठवण्याची गरज आहे असे मत माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
विजयनगर-अकलूज येथील शिवामृत दूध संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना खा मोहिते पाटील म्हणाले, शेतकरी हा देशाचा आत्मा आहे, परंतु सरकार जीएसटीच्या माध्यमातून या आत्म्यावर कररुपी घाला घालीत आहे.
खा. मोहिते पाटील म्हणाले, बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, यंत्रसामुग्री आदींच्या खरेदीसाठी जीएसटी अंतर्गत कर आकारला जात आहे, परंतु भरलेल्या जीएसटीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कोणताही नोंदणी क्रमांक दिला जात नाही.
मात्र व्यावसायिक, उद्योजक इत्यादी धनाढ्य घटकांना केवळ जीएसटी नोंदणीची सुविधाच नव्हे, तर त्यांना उत्पादन खर्चावर भरलेल्या कराच्या लाभावर सेट-ऑफ सूट आदीचा दावा करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जीएसटीच्या जाचक विळख्यातून शेतकऱ्यांची सुटका होईल, अशी यंत्रणा सरकारने निर्माण करावी. बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, यंत्रसामुग्री आदीच्या
खरेदीदरम्यान भरलेल्या जीएसटीच्या रकमेवर सेंटऑफ, सवलत किंवा परताव्याचा लाभ शेतकऱ्याना मिळू शकेल, अशी यंत्रणा निर्माण झाली तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात १८ टक्क्यांनी वाढ होईल.
शेतकऱ्यांच्या घामावर व भाकरीवर देखील जीएसटीच्या माध्यमातून कर आकारला जात आहे. त्यामुळे, लाडकी बहिण योजनेचा १,५००/- रुपयांचा आनंद येण्यापूर्वी, पत्नीनी आपल्या पतीला विचारावे, मुलीनी वडिलांना विचारावे आणि आईने आपल्या मुलांना विचारले पाहिजे की ते सरकारला किती जीएसटी देत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज