मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा : लऊळ (ता. माढा) येथे अनैतिक संबंधातून एका युवकाचा खून झाल्याची घटना दि. 7 मार्च रोजी रात्री 11.30 ते 11.45 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
राजाराम शिवाजी घुगे (वय 30, रा. लऊळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील लऊळ बसस्थानकाजवळील गोरे वस्तीवर संतोष खंडू गोरे (वय 38) व खंडू सुखदेव गोरे (70) राहतात. या ठिकाणी राजाराम शिवाजी घुगे (29, रा. घुगे वस्ती) हा रात्री गोरे वस्तीवर आला.
यावेळी संतोष पत्नीचे राजारामबरोबर असलेल्या प्रेमसंबंधामुळे चिडला होता. यामुळे संतोष गोरे याने राजाराम घुगे याच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याला ठार केले आहे, असा जबाब मृत राजारामचा भाऊ संभाजी घुगे (वय 37) याने कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात दिला आहे.
संशयित आरोपी संतोष खंडू गोरे, खंडू सुखदेव गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करत आहेत.
जगभरातील लाखो वाचक असलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.mangalwedhatimes.in
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज