टीम मंगळवेढा टाइम्स।
मंगळवेढा येथील उद्योजक राहुल ताड यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.24 ऑगस्ट रोजी मित्र परिवारांनी राहुल ताड यांच्या दीर्घायुष्यासाठी पूजा केली आहे.
माचनुर येथील सिध्देश्वर मंदिरात ताड यांच्या समर्थकांनी वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य लाभो व दीर्घायुष्य लाभो यासाठी पूजा केली आहे.
याप्रसंगी एसआरटी कॅफेचे मालक शक्ती ताड, प्रथमेश माने, ऋषी पवार, आदित्य महामुनी, पठाण आदीजन मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कोणालाही रात्र-पहाट केव्हाही गरज असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहणे, मनात कोणताही वैयक्तिक हेतू न ठेवता शक्य होईल तितके सहाय्य करण्याचा स्वभाव असणारे एक संघर्षवादी व्यक्तिमत्त्व म्हणजे उद्योजक राहुल ताड आहेत.
विकासात्मक आराखडा तयार करून समाजाच्या उन्नतीसाठी सतत कार्यमग्न राहणारे, खिलाडी ग्रुपचे अध्यक्ष राहुल ताड हे मंगळवेढ्याच्या राजकीय पटलावर युवा नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत.
राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने उत्तुंग भरारी घेत राहुल ताड यांनी समाजामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला आहे.
अत्यंत साधे राहणीमान, वक्तशीरपणा, मृदू स्वभाव, सदा प्रसन्न अन् प्रचंड जनसंपर्क ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खास वैशिष्ट्ये आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज