टीम मंगळवेढा टाईम्स ।
इकोमिल्क अँड लॅक्टोस्कॅन मेनुफेक्चर कंपनीचे मालक महादेव यादव यांनी लोकांना कमी पैशात मशनिरी उपलब्ध करून दिली असून त्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर यांनी सांगितले
ते मंगळवेढा शहरात मुरलीधर चौकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या इकोमिल्क अँड लॅक्टोस्कॅन मेनुफेक्चर या कंपनीच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक जयंत साळे, शिवाजी नागणे, मारुती लवटे,यशवंत मिल्क डेअरीचे चेअरमन संतोष पाटील, समर्थ डेयरी चेअरमन संतोष कौडूभैरी,प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, सत्यवान यादव, चेअरमन बाळासाहेब माळी,संचालक भास्कर शिंदे,विनायक यादव,हरिभाऊ यादव,तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब यादव,प्रमोद पाटील,राजकुमार यादव,संतोष माने आदीजन उपस्थित होते.
सर्व फॅट मशीन भारतात वितरण करण्यात येणार आहे,दूध डेयरी चालकांना दूध तपासणीसाठी आता इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.इकोमिल्क अँड लॅक्टोस्कॅन मेनुफेक्चर या कंपनीने विक्री व दुरुस्ती सेवा मंगळवेढ्यात सुरू केल्याने अनेकांना याचा फायदा होणार असल्याचे महादेव यादव यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज