मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्व व्यवहार ठप्प होऊन अर्थचक्र थांबले . परंतु या काळात घरात असलेल्या मुलांपासून मोठ्यांचा आंनद , उत्साह टिकवून ठेवण्यासाठी महिलांकडून घरगुती केक , बिस्कीट , चॉकलेटची निर्मिती दुपटीने वाढल्याचे दिसून आले.
कोको पावडर , चॉकलेट यांना या काळात मोठी मागणी होती , अशी माहिती देशातील कोको व चॉकलेट उत्पादनात अग्रगण्य असलेल्ये मोरडे फूड्सचे संचालक हर्षल मोरडे यांनी दिली आहे.
मोरडे म्हणाले , लॉकडाऊनचा ५० टक्के परिणाम व्यवसायावर झाला असला तरी इतर उद्योगांपेक्षा चॉकलेट , बिस्कीटची मागणी देशभरात चांगल्या प्रकारे होती . हॉटेल , दुकाने , विक्रेते यांचा व्यवहार बंद असल्याने त्याचा परिणाम आमच्यावर झाला. मात्र , या काळात बिस्किटासोबतच चॉकलेट निर्मितिी घराघरात मोठ्या प्रमाणात झाली.
घरगुती वापर कशा प्रकारे वाढला जाईल यादृष्टीने विचार करून घरपोच छोटे पॅकिंग यापुढील काळात निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. Women’s emphasis on making cakes, biscuits, chocolates during lockdown
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज