टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे
8 मार्चला जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहेत. टेक्नोलॉजीच्या युगात आज महिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील सक्रिय आहेत.
मात्र या प्लॅटफॉर्म्सचा वापर करताना महिलांनी सावधगिरी बाळगायला हवी. केवळ महिलाच नाही तर प्रत्येकाने सोशल मीडियाचा वापर करताना सिक्युरिटी फीचर्सचा वापर करायला हवा. जेणेकरून तुमची गोपनीयता सुरक्षित राहील असे प्रतिपादन सारा कॉम्प्युटरचे सर्वेसर्वा सागर पाटील सर यांनी केले आहे.
आज जागतिक महिला दिनानिमित्ताने मंगळवेढा येथील सारा कॉम्प्युटर यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी जिजामाता महिला सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सौ आशाताई रामकृष्ण नागणे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास सौ.श्रुती राजमाने, स्मिता रायबान, पुजा पाटील, मुळीक, उन्हाळे, माईनकर, बुरुंगले, इंगळे, खांडेकर, सय्यद, तांबोळी, देशमुख, मोरे, माने, शिंदे, टोणगे- पाटील, कोरे, खताळ, सय्यद, आदी महिला उपस्थित होत्या.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हे फीचर डाटा सुरक्षेसाठी देण्यात आलेले आहे. अॅप अथवा वेबसाईटवर जाऊन हे फीचर इनेबल करता येते. या फीचरमुळे प्रोफाईल हॅक करणे अवघड होते.
थर्ट पार्टी अॅप्सपासून सावधान –
खासकरून फेसबुक वापरणाऱ्या युजर्सनी कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सला आपली खाजगी माहिती देऊ नये. फेसबुकवर असे अनेक थर्ड पार्टी अॅप्स आहेत, जे तुमची खाजगी माहिती तुमच्या नकळत वापरतात. या अॅप्सला फेसबुकच्या सेटिंग्समधून तुम्ही रिमूव्ह करू शकता.
प्रोफाइल प्रायव्हेसी –
कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचा मोबाईल नंबर, पत्ता आणि ईमेल आयडी हाइड करून ठेवावा. जेणेकरून तुमची खाजगी माहिती सार्वजनिक होणार नाही.
ग्रुप प्रायव्हेसी –
व्हॉट्सअॅप, फेसबुक मेसेंजरवर अनेक चॅटग्रुपवर तुम्हाला न सांगता अॅड केले जाते. जर अशा ग्रुपमध्ये तुम्ही नकळत जोडले गेले असाल तर त्वरित त्यातून लेफ्ट व्हावे. तुम्हाला ग्रुपमध्ये कोणी अॅड करावे व कोणी करू नये, याचे सेटिंग्स देखील तुम्ही सेटिंग्समधून करू शकता.
फोटो प्रायव्हेसी –
सोशल मीडियावर फोटो अथवा व्हिडीओ शेअर करताना ती पोस्ट सार्वजनिक ठेवावी की केवळ तुमच्या फ्रेंडससाठी ठेवावी, याचा विचार करावा. सर्वच पोस्ट पब्लिक ठेवण्याची गरज नाही. जेणेकरून तुमची गोपनियता टिकून राहील.
या कार्यक्रमास वैष्णवी उन्हाळे, आदित्य डोंगरे, तुषार सोमदळे, प्रदीप भिंगे यांचे सहकार्य लाभले..
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज