टीम मंगळवेढा टाईम्स ।
महिला व बालविकास विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या विभागात 18 हजार 882 पदांची भरतीहोणार आहे.
या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र शासनाने 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18882 पदांची भरती करण्यात येणार आहे.
14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान भरती प्रक्रिया राबवण्यात येणार
14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही प्रक्रियाही पारदर्शक पद्धतीनं राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांचीही भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी
महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. कारण 18882 पदांची भरती या महिला आणि बालविकास विभागात होणार आहे. अद्याप विभागानं याबाबतच्या कोणत्याही तारखा निश्चित केल्या नाहीत.
यासंदर्रभातील भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याचे सागंण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळं महिला उमेदवारांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज