टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतकऱ्यांने किराणा दुकानदार महिलेस नारळाचे उर्वरित पैसे मागितल्याच्या कारणावरून चिडून प्रशांत लक्ष्मण उन्हाळे (रा.उन्हाळे वस्ती,मंगळवेढा) यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून
विनयभंगाची व अॅट्रॉसिटीची खोटी केस दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी डोंगरगांव येथील एका किराणा दुकानदार चालक महिलेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्याद प्रशांत लक्ष्मण उन्हाळे रा.उन्हाळे वस्ती, मंगळवेढा यांनी दिली आहे. फिर्यादीच्या शेतात नारळ व आंब्याची झाडे आहेत.
डोंगरगांव येथील किराणा दुकानदार महिलेस नारळ व आंब्याची येणेबाकी होती. १९ रोजी सकाळी ९ वाजता उधारीचे
१०० रुपये मागितले असता संशयित आरोपीने नारळ खराब निघाल्याची सबब सांगून पैसे देणार नसल्याचे सांगितले.
शिवाय शिवीगाळ व दमदाटी करून विनयभंग व अॅट्रॉसिटीची केस दाखल करीन अशी धमकी देवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, अशी मंगळवेढा पोलिसात नोंद आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज