टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील दत्तनगरमधून एक ३६ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवेढा पोलिसात दाखल झाली असून त्या बेपत्ता महिलेचा कसून शोध पोलिस घेत आहेत.
मंगळवेढा शहरातील दत्तनगर येथे खबर देणारे व्दारकेश सुर्यवंशी व बेपत्ता महिला हे भाडयाने घर करून गेल्या दोन वर्षापासून मैत्री असल्याने ते रहात होते.
दि.११ रोजी १०.०० वा. सदर महिलेच्या घरी खबर देणारे गेले असता घर उघडे दिसले व घरातील साहित्य दिसून आले नाही.
घर मालकीणीकडे चौकशी केली असता पहाटे ४.०० वा सदर बेपत्ता महिला अंघोळीला जाताना पाहिले असल्याचे सांगितले.
बेपत्ता महिलेच्या नातेवाईकाकडे व आजूबाजूला तीचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
तिचा रंग गोरा, अंगाने सडपातळ, नाक मोठे, चेहरा गोल, उंची ४ फुट ७ इंच, नेसणेस अंगावर चुडीदार, शिक्षण १२ वी अशा वर्णनाची स्त्री कोणाच्या नजरेस आल्यास मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे पोलिसांनी आवाहन केले आहे.
उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचे झेडपी अध्यक्षांनी केले स्वागत
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे यांनी गांधीगिरी करत उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत करत मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या. कांबळे हे कार्यालयीन वेळेच्या अगोदरच झेडपीत दाखल झाले.
स्वतःच्या दालनातन जाता ते प्रवेशद्वारातच थांबले. वेळेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वागत करतानाच त्यांनी उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचे देखील स्वागत केले. त्यांना चहा देण्याची देखील व्यवस्था त्यांनी केली.
हे करतानाच त्यांनी उशिरा तसेच विनामास्क येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची सूचना सीईओ दिलीप स्वामी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून दिल्या.
महिला वकिलाचा विनयभंग
सोलापूर येथील महिला वकील ही ऑफिसकडे जात असताना दोघा तरुणांनी तिचा विनयभंग केल्याची घटना दि.९ मार्च रोजी सोलापुरात घडली.
याप्रकरणी आरोपी बबलू उर्फ गिरीश पुरुषोत्तम कड्याल व त्याचा मित्र असे दोघांविरुद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाठलाग करून , दमदाटी करून , अश्लील भाषेत शिवीगाळ केली.तसेच त्या महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोसई शेटे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज