मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क |
मंगळवेढा बसस्थानक परिसरातून 25 वर्षीय महिलेसह दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने पोलीसात दिली आहे. दरम्यान पोलीस त्या बेपत्ता महिलेचा कसून शोध घेत आहेत.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, यातील बेपत्ता महिला ही पंढरपूर तालुक्यातील असून ती दि.23 रोजी घरी सोलापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती करिता जात असल्याचे सांगून घरातून निघून आली होती.
ती दुपारी 12 वाजता मंगळवेढा बसस्थानक परिसरातून बेपत्ता झाली असल्याचे तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेचे वर्णन उंची 4 फुट, रंग मध्यम काळा, अंगाने जाड, सोबत सहा वर्षाची व तीन वर्षाची दोन मुली आहेत. त्यांचे वर्णन अंगात पांढर्या रंगाचा फ्रॉक,
डोकीस पांढर्या रंगा बेल्ट, उची दोन फुट, रंगाने सावळी, दुसर्या मुलीचे वर्णन लाल रंगाचा टॉप व जीन पँट, उंची दीड फुट, रंग गोरा,
अंगाने पातळ अशा वर्णनाच्या मायलेकी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा शहरचे पोलीस हवालदार पठाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज