मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथे बंद पडलेल्या वीज जोडणीचे काम करत असताना विजेच्या खांबावरून पडून अविनाश वाघमारे (वय २२) या वायरमनचा मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. या घटनेने अविनाश वाघमारे गावावर शोककळा पसरली आहे.आई-वडिलाविना पोरक्या असलेल्या बहिणी आता एकुलत्या भावालाही पोरक्या झाल्या आहेत.घरनिकी,गुंजेगाव,मारापूर या तीन ठिकाणी अविनाश कार्यरत होते.
मारापूर येथील विद्युतपुरवठा खंडित झाला. तो पूर्ववत करण्यासाठी जंप जोडण्यासाठी ते खांबावर चढले होते. ते अचानक खांबावरून पडून जखमी झाले. तत्काळ उपचारासाठी पंढरपूर येथे नेण्यात आले,परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.अविनाश लहान असताना आई – वडिलांना पोरका झाला होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज