टीम मंगळवेढा टाईम्स ।
येणाऱ्या मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) तर्फे शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांची मते जाणून घेण्यासाठी तसेच निवडणुकीचे धोरण ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

या बैठकीस माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, तसेच भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे चेअरमन अनिलदादा सावंत प्रमुख उपस्थित होते.

बैठकीदरम्यान बोलताना अनिलदादा सावंत म्हणाले, “नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. माझ्यासाठी माझ्या निवडणुकीत झटलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही माझी जबाबदारी आहे.

मी माझी संपूर्ण ताकद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी लावणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “वरिष्ठांच्या आदेशानुसार येणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या स्वरूपात लढवायच्या आहेत.

परंतु आपला पक्ष म्हणून प्रथम आपली तयारी करणे आवश्यक असून आपल्या पक्षातील इच्छुक उमेदवाराचे मत विचारात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येकाने एकदिलाने काम करून पक्षाच्या उमेदवारांना विजयी करणे हीच आपली प्राथमिकता आहे.”

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले, “नगरपरिषद निवडणुकीत सर्वांनी ताकदीने व एकजुटीने लढा देऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम उमेदवार उभा करावा. स्वच्छ, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.”
या प्रसंगी तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी यांनी केले, तर आभारप्रदर्शन राजाभाऊ चेळेकर यांनी केले.
बैठकीस किसन गवळी, सुरेश कट्टे, पांडुरंग माळी, पांडुरंग निराळे, प्रशांत यादव, अॅड. विनायक नागणे, संतोष नागणे, दादासाहेब पवार, सदाशिव माळी, माणिक गुंगे, बबन ढावरे, महादेव जिरगे, समाधान नागणे,बापुराव वस्त्रे , नागेश राऊत, लक्ष्मण नागणे,मुजमिल काझी,

महादेव मुदगुल, सुलेमान तांबोळी, दत्तात्रय ओमने ,आर. के. जाधव, मायाप्पा प्रक्षाळे ,दत्तात्रय शिर्के, पांडुरंग जावळे, संतोष गोवे, अजिंक्य बेंदरे, जमीर इनामदार, देवदत्त पवार, श्रीकांत गवळी, सागर गुरव,
विजय पवार, पंडित गवळी, सिताराम भगरे, वैभव ठेंगील, स्मिता आवघडे, मंदाकिनी सावजी, वंदना जगताप, भाग्यश्री माळी यांच्यासह मंगळवेढा शहरातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











