mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

स्व.आमदार भारत भालके यांचा उत्तराधिकारी विचारांचा असणार की रक्ताचा ?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 8, 2020
in सोलापूर, राजकारण
आमदार भालके यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नये : व्यंकट भालके

टीम मंगळवेढा टाईम्स ।

‘राजा का बेटा अभी राजा नहीं बनेगा, जो काबिल होगा वही हकदार बनेगा’ या आ. भारत भालके यांच्या २००९ सालच्या निवडणुकीतील विधानाची डिव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी शोकसभेत आठवण करून दिली.

अन् एकप्रकारे मतदारसंघाच्या ‘बदलत्या राजकारणाचा’ गर्भित असा अभिजात अर्थ सांगताना भालकेचा वारस विचारांचा की रक्ताचा होणार ? याबाबतही प्रश्नचिन्ह उभा केले.

कै.आ.भारत भालके यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी तनपुरे महाराज मठात श्रध्दांजली सभा झाली.या शोकसभेत सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

या शोकसभेत सर्वपक्षीय नेते तसेच विठ्ठल परिवारांकडून प्रामुख्याने भगीरथ भालके यांचे नाव अग्रक्रमाने पोटनिवडणुकीसाठी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करीत कै.आमदार भारत भालके यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सन २००९ सालचे काय होते भारत भालकेंचे विधान?

सन २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पंढरपुरात विधानसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार होते.यावेळी मोहिते-पाटील यांना विधानसभेत बिनविरोध पाठवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू होते. अशातच मोहिते पाटील यांना थेट आव्हान भारत भालके यांनी दिले होते.यावेळी त्यांनी प्रचारात राजा का बेटा अभी राजा नही बनेगा, जो काबिल होगा बकी हकदार बनेगा’ अशी कोटी करत आपणच विधानसभेसाठी ‘सक्षम’ असल्याचे मतदारसंघाला पटवून दिले. आणि आमदारकीचा ताज भालकेंनी जनमतांवर मिळवला होता.

याप्रसंगीच डिव्हीपी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी सन २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीतील भारतनानांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांच्या आठवणी जागवल्या , आणि विट्ठल परिवाराच्या नेते ” पदासाठी सक्षम व्यक्तींची गरज असल्याचे अप्रत्यक्षरित्या सूचविले.

अभितीत पाटील यांची गेल्या काही महिन्यामध्ये विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांशी जवळीक वाढलेली दिसून येत आहे.

यामध्येच आगामी तीन महिन्याच्या आसपास होणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्यासाठी देखिल पाटील इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी तयारीही सुरू ठेवली आहे. यामध्ये विठ्ठल परिवारातील प्रस्थापितांपासून दुरावलेल्या नेतेमंडळीशी ते वारंवार हितगुज करतात.

अभिजीत पाटील यांनी थेट भालकेंच्या श्रध्दांजली सभेच्या निमित्ताने आमदार भारतनानांच्याच विधानाच्या आठवणीना उजाळा देताना मतदारसंघातील जनतेला एकप्रकारे बदलत्या राजकारणाचा अभिजात असा गर्भित संकेत देण्याचा प्रयत्न केला आहे. अशी चर्चा राजकीय पंडीताकडून होत आहे.

पाटील यांनी जो काबिल होगा वही हकदार बनेगा असा शेर सांगत असताना एकीकडे भगीरथ भालके यांनी पितृशोक मनात ठेवत कारखान्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली तर मतदारसंघातील सहकाऱ्यांच्या सुख- दु : खात सहभागी होण्यास ते सक्रीय झाले.

खरंतर भगीरथ भालके यांना आगमी काळात मार्गक्रमकण करताना सहानभुती वगळता, प्रत्येक राजकीय पाऊल टाकणे सोपे नाही. त्यांना स्वत : ला सर्वच कसोट्यांवर सिद्ध करावे लागणार आहे.

तर दुसरीकडे ‘काबिल’ पणाच्या गोष्टी करणाऱ्या अभितीत पाटील यांनी तीन खासगी कारखाने सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर चांगल्या पद्धतीने चालवून स्वत : ला सिध्द केले आहे. आणि हीच बाब निश्चितच बदलाची ‘ नांदी ‘ ठरणारी असू शकते.

आगामी काळात विठ्ठल कारखाना असो, अथवा कुठल्याही प्रकारची निवडणूक असो, यामध्ये विठ्ठल परिवाराची मोट बांधून पुढे चालण्याचे काम अभिजीत पाटील यांच्याकडून होऊ शकते.

तसेच आ.भालके यांचा कार्यकर्त्यांनी विठ्ठल परिवारासाठी वेगळा वारसदार निवडला तर निश्चितच त्याला तगडे आव्हान देण्याचे काम पाटील यांच्याकडून झाले तर आश्चर्य वाटायला नको.(source : संकेत कुलकर्णी, तरुण भारत संवाद)

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार भारत भालके
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
शरद पवार आज व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून मंगळवेढेकरांशी साधणार संवाद

मोठी बातमी! शरद पवार तब्बल नऊ वर्षानंतर मंगळवेढा दौऱ्यावर; आज ‘या’ सोहळ्यास उपस्थित राहणार

January 28, 2023
शेतकऱ्यांना अपुऱ्या व विस्कळीत वीज पुरवठ्यापासून दिलासा; नवीन डीपी व क्षमतावाढसाठी ६ कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर; आ.समाधान आवताडे यांची माहिती

मतदारसंघातील दलित समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर; आ.आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर संपूर्ण समाज जाम खुश; निधी मंजूर झालेली गावे व कामे पाहा..

January 25, 2023
जिल्हाधिकारी साहेब! वाळू माफियांची दहशत वाढली; वाळू ठेकदाराकडून शेतकऱ्यांना मारहाण

लाडाचा जावई! माहेरात गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या जावयाला सासुरवाडीत बेदम मारहाण

January 25, 2023
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

एकाच मैदानात दोघेही! महेंद्र गायकवाड अन् सिकंदर शेख पुन्हा एका आखाड्यात; या लक्षवेधी लढतींकडे असणार लक्ष

January 23, 2023
हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

हळदी-कुंकू समारंभात विधवा महिलांना सुवासिनी अन् संक्रांतीच्या वाणाचा मान; मंगळवेढ्यातील अनोख्या उपक्रमाची चर्चा

January 23, 2023
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

January 21, 2023
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

भगीरथ भालके यांनी घेतलेला निर्णय मागे घ्यावा; अन्यथा त्यांची ती राजकीय आत्महत्या ठरेल; अनेक कार्यकर्ते भालकेंची साथ सोडणार?

January 20, 2023
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हृदयद्रावक घटना! चक्कर आली अन् निमित्त झाले; आईचा मन हेलावणारा हंबरडा; तिसरीचा पेपर लिहिताना विद्यार्थिनीला मृत्यूनं गाठलं..

January 20, 2023
Next Post
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढ्यात सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यावर  चाकू हल्ला, चौघाविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

गर्जा महाराष्ट्र! महाराष्ट्राच्या राज्यगीतावर शिक्कामोर्तब, ‘या’ तारखेपासून गीत अंगिकारण्यात येणार; शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये ‘हे’ महत्वाचे निर्णय घेतले

January 31, 2023
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात झाडे तोडण्याच्या कारणावरुन एका महिलेस चावा घेवून कोयत्याने केला हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
खळबळजनक! मंगळवेढ्यात तरुणावर तलवारीने हल्ला; कारण फक्त… तिघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढ्यात ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर मालकाचा कारखान्यातील दोन कर्मचार्‍यावर कोयत्याने हल्ला

January 31, 2023
सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

सोलापूरकरांनो! साडेसहा तासांत पोचा मुंबईला, सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस; पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा

January 30, 2023
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

सर्वत्र कौतुक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विधवा पुर्नविवाह प्रथेस मंजुरी

January 30, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा