मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
सासऱ्याच्या हिश्श्यातून आलेली जमीन घेण्यास वारंवार सांगूनही नाकारात असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिचा खून केल्याप्रकरणी बार्शी न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही. एस. मलकलपट्टी यांनी आरोपी पती किरण तुकाराम घरबुडवे यास जन्मठेपेची शिक्षा आणि १० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना बार्शी तालुक्यात मुंगशी (आर) ते उपळे (दु) रस्त्यावर २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी घडली होती. घटनेच्या दिवशी आरोपी पत्नी आणि दोन मुलांसह दुचाकीवरून जात होते. त्यावेळी जमिनीचा राग मनात धरून त्याने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात पत्नीचा मृत्यू झाला.

धामणगावच्या पोलिस पाटलांनी मृत विवाहितेचा भाऊ अतुल दिलीप हेडांबे (रा. धामणगाव, दु. ता. बार्शी) यांना माहिती दिली. हेडांबे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली

आणि वैराग पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी किरण घरबुडवे (वय ४३, रा. भातंबरे, ता. बार्शी) याच्याविरुद्ध पोलिसांनी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला होता.

पोलिस निरीक्षक विनय रामचंद्र बहिर यांनी सबळ पुरावे गोळा करून बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सहा. सरकारी अभियोक्ता अॅड. दिनेश देशमुख यांनी १२ साक्षीदारांची तपासणी करून

तपासात गोळा केलेले पुरावे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ते ग्राह्य धरून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

याप्रकरणी सरकारतर्फे अॅड. दिनेश देशमुख, डीवायएसपी अशोक सायकर, पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक विनय बहिर, तर कोर्ट पैरवी पो. हे. कॉ. कृणाल पाटील यांनी काम पाहिले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











