mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा जिल्हा परिषदेसाठी 65.53 टक्के मतदान; चार जिल्हा परिषद गटात असे झाले मतदान; टोटल आकडेवारी आली समोर..; घसरलेल्या मताचा फटका कुणाला बसणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 8, 2026
in मंगळवेढा
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढा टाईम्स न्युज। 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी मंगळवेढा तालुक्यात चुरशीने 65.52 इतके टक्के मतदान झाले.

मतदानादरम्यान मुढवीत किरकोळ वादावादीची घटना वगळता अन्य ठिकाणी शांततेत मतदान झाले. उशिरापर्यत ग्रामीण भागात मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.

जिल्हा परिषदेच्या चार आणि पंचायत समितीच्या आठ जागेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

1 लाख 69 हजार 539 मतदारांपैकी 1 लाख 11 हजार 86 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला 57 हजार 836 पुरुष तर 53 हजार 350 स्त्रियांनी मतदान केले.

चोखामेळा नगर गणात क्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार संगीता लेंडवे यांनी पाठिंबा भाजपच्या दिपाली ताड यांना दिला होता. तर दामाजी नगर जिल्हा परिषद गटातील अमोल टेळे यांनी आपला पाठिंबा तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे महावीर ठेंगील यांना दिल्यामुळे लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद आणि लक्ष्मी दहिवडी गण वगळता बाकी ठिकाणी दुरंगी लढत झाली.

भोसे गटात डी फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला असून त्यामुळे प्रदीप खांडेकर यांना विजयाची संधी आहे.

हूलजंती गटात देखील संगीता दुधाळ यांच्या बाजूने कल गेले असल्याचे बोलले जात आहे तर मरवडे गावात निकालाच्या आधीच फटाके फोडून आनंद साजरा केला गेला आहे.

गट निहाय मतदान

भोसे गटात 30 हजार 847 मतदारांनी आपला हक्क बजावला असून त्यामध्ये भोसे गणांतून 16 हजार 365 तर रड्डे गणांतून 14 हजार 482 इतक्या मतदारांनी मतदान केले आहे.

लक्ष्मी दहिवडी गटात 27 हजार 217 मतदारांनी आपला हक्क बजावला असून त्यामध्ये संत चोखामेळानगर गणांतून 12 हजार 506 तर लक्ष्मी दहिवडी गणांतून 14 हजार 711 इतक्या मतदारांनी मतदान केले आहे.

हुलजंती गटात 28 हजार 376 मतदारांनी आपला हक्क बजावला असून त्यामध्ये हुलजंती गणांतून 13 हजार 777 तर मरवडे गणांतून 14 हजार 599 इतक्या मतदारांनी मतदान केले आहे.

संत दामाजीनगर गटात 24 हजार 646 मतदारांनी आपला हक्क बजावला असून त्यामध्ये संत दामाजीनगर गणांतून 11 हजार 30 तर बोराले गणांतून 13 हजार 616 इतक्या मतदारांनी मतदान केले आहे.

काल सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग अतिशय संथ होता दिवसभर मजूरीच्या कामानंतर सायंकाळी मतदानाचा वेग वाढला.

वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या नातेवाईकांनी जमेल त्या वाहनात आणून त्यांचे मतदान करून घेतले. मरवडे येथे संभू गणपाटील 112 वर्षाच्या वयोवृद्धाने मतदान केले.

विधानसभेप्रमाणे बाहेरील मतदारांना आणण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्यामुळे मतदानाचा टक्का यंदा घसरला. त्यामुळे या घसरलेल्या मताचा टक्का हा कुणाला बसणार हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

मरवडे येथे मतदान केंद्राच्या आवारात उल्लडबाजी केलेल्या तरुणांना पोलिसांचा लाठीचा चोप दिला.

दामाजीनगर गटामध्ये भीमा नदीत पाणी आणि जातीय समीकरणावर चुरशीने मतदान झाले. तर हुलजंती जिल्हा परिषद गटामध्ये संगीता दुधाळ व जयश्री माने हे एकाच समाजाचे उमेदवार असल्याने ठिकाणी देखील चुरस दिसून आली.

हुलजंती गणातून मिळणाऱ्या मताचा मताधिक्यावर या विजयाचे गणित बांधले जाणार आहे भोसे जिल्हा परिषद गटात सुरुवातीला भूमिपुत्राच्या मुद्द्यावर गाजली अखेरच्या टप्प्यात ही निवडणूक जातीय समीकरणावर येऊन ठेपले. परंतु प्रत्यक्षात मतदान कोणत्या समीकरणावर झाले हे देखील. या ठिकाणी पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

निवडणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा जिल्हा परिषद निवडणूक

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 27, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 27, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

खळबळ! पंचायत समितीत ‘बदल’ वारे! विजयकुमार देशमुखांकडे सूत्रे; प्रशासकीय कामांना मिळणार नवी गती?

March 26, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

मंगळवेढा भीषण अपघात प्रकरण: टेम्पो चालकाची निर्दोष मुक्तता; ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तिवाद यशस्वी

March 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मंगळवेढ्याचा डंका! राज्यस्तरीय ‘ब्रेन डेव्हलपमेंट’ परीक्षेत न.पा. मुले शाळा नं. १ चे देदीप्यमान यश

March 25, 2026
कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

कै.दत्ताजीराव भाकरे यांना आरोग्य सेवेतून आगळीवेगळी श्रद्धांजली; स्मृतीदिनानिमित्त आंधळगावात भव्य आरोग्य व रक्तदान शिबिर संपन्न

March 24, 2026
विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

मंगळवेढ्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सारा कॉम्प्युटर’मध्ये CCC सह AI आणि कोडिंग कोर्सेसचे प्रवेश सुरू; आधुनिक काळाची गरज

March 24, 2026
Next Post
गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम ‘या’ गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

गावागावात चर्चा, मनात धाकधूक! ११ फेऱ्यांनंतर गुलाल नेमका कोणावर पडणार? प्रथम 'या' गटाची होणार मतमोजणी; प्रशासन सज्ज

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 27, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 27, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा