मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन गावी परत जाताना वृद्धाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रुईछत्तीसी (ता. अहिल्यानगर) येथे रविवारी (३० जून) सकाळी ही घटना उघडकीस आली. सुखदेव लक्ष्मण रावे (६२, रा. मिसळवाडी, बुलडाणा) असे मृताचे नाव आहे.
त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मिसळवाडी (बुलडाणा) येथील सुखदेव लक्ष्मण रावे हे दरवर्षी पंढरपूरची वारी करीत. या वर्षी ते मिसळवाडी गावाहून आळंदीला गेले. तेथून ते दिंडीत सहभागी झाले.
दरम्यान, दिंडीचा मुक्काम नातेपुते (सोलापूर) येथे असताना त्यांनी एसटीने पंढरपूर गाठले. तेथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते पुन्हा एसटीने गावाकडे जात होते. मात्र, शनिवारी (२९ जून) सायंकाळी ते रुईछत्तीशी गावाजवळ उतरले.
त्यानंतर ३० जून रोजी सकाळी रुईछत्तीसी येथील धर्मा अण्णा गोरे यांच्या शेतात लिंबाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सुखदेव यांचा मृतदेह आढळून आला.
नगर तालुका पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून रावे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मृत रावे यांचा सलूनचा व्यवसाय
मृत सुखदेव रावे यांचे कुटुंब २५ वर्षांपूर्वी चिखली तालुक्यातील वरखेड येथून मिसळवाडी येथे स्थलांतरित झाले होते. त्यांनी शेळगाव-आटोळ येथे हेअर सलूनचे दुकान सुरू केले होते. मुलगा आणि सुखदेव रावे हे दोघे बाप-लेक हेअर सलूनचा व्यवसाय करीत होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज