मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
कारागृहात असताना त्यांच्या सहीने टक्केवारी घेऊन चेक बाधीत शेतकर्यांना दिल्याची विभागीय आयुक्ताकडे तक्रार
मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी दि.29 एप्रिल ते 12 मे अखेर रजेवर असताना राष्ट्रीय महामार्गात भूसंपादन झालेल्या जमिनीचा मोबदला स्वत:च्या सहीने
व कारागृहात असलेल्या तलाठ्याच्या सहीने टक्केवारी घेऊन बाधीत शेतकर्याला चेक दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची लेखी तक्रार पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गेजगे यांनी केली आहे.
या घटनेची हकीकत अशी, मंगळवेढ्याचे प्रांत अधिकारी हे दि.29 एप्रिल ते 12 मे अखेर रजेवर गेले आहेत.
सध्या कार्यभार अन्य प्रांत अधिकार्याकडे देण्यात आला आहे. जुनोनी ता.सांगोला येथील गट नं. 365 हा राष्ट्रीय महामार्गात भूसंपादन झालेल्या जमिनीचा जवळपास एक कोटीचा मोबदला
रजेवर गेलेल्या प्रांत अधिकार्यांनी स्वत: सही करुन तसेच सध्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेला तलाठी आरोपी याने त्याच्यावर सह्या करुन
टक्केवारी घेऊन तो चेक बाधीत शेतकर्याला दिला असल्याचा आरोप संजय गेजगे यांचा असून त्यांनी स्वत:च्या लेटरपॅडवर पुणे विभागीय आयुक्त, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आदींकडे लेखी तक्रार करुन ही गंभीर घटना असल्याने याची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी होवून संबंधितावर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित बँकेच्या कारभाराविषयी संशय व्यक्त केला जात असून त्या अधिकाऱ्याचीही चौकशी व्हावी अशी देखील मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज